शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : देशातील कोरोना रुग्णांचा आकडा ७० लाखांवर; गेल्या २४ तासांत ७४,३८३ नवे रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 12:33 IST

CoronaVirus News : देशातील रुग्णांचा आकडा ७० लाखांवर गेला असून एक लाखहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देदेशात गेल्या २४ तासांत १० लाख ७८ हजार ५४४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनापुढे प्रगत देशही हतबल झाले आहेत. जगभरात लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. देशातील रुग्णांचा आकडा ७० लाखांवर गेला असून एक लाखहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी (११ ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७४ हजार ३८३ नवे रुग्ण आढळून आले. तर ९१८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७० लाख ५३ हजारांवर पोहोचली. देशात आतापर्यंत १ लाख ८ हजार ३३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ६० लाख ७७ हजार ९७७ लोक बरे झाले आहेत. देशात सध्या ८ लाख ६७ हजार ८९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आयसीएमआरच्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत १० लाख ७८ हजार ५४४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.

अमेरिकेमध्ये ७८.९४ लाख रुग्ण जगभरातील रुग्णसंख्या ०३.७१ कोटींपेक्षा अधिक झाली. सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर अमेरिकेमध्ये ७८.९४ लाख रुग्ण आहेत. दुस-या क्रमांकावरील भारतामधील रुग्णसंख्या अमेरिकेपेक्षा ०९.०० लाखांनी कमी आहे, तर तिस-या स्थानावरील ब्राझीलमध्ये ५०.५७ लाख रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढलेराज्यात मागील काही दिवसांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात शनिवारी २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी झाले, तर आतापर्यंत १२ लाख ५५ हजार ७७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.७६ टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या राज्यात २ लाख २१ हजार १५६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत