शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

CoronaVirus News : दिल्ली-एनसीआरमध्ये १० हजारांहून अधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 00:08 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : दिल्लीच्या तुलनेत नोएडा, गुरुग्राम, गाझियाबाद आणि फरिदाबाद या शहरांमधील रुग्ण वाढण्याचे प्रमाण खूप कमी आहे. मात्र या जिल्ह्यांचा आकार लक्षात घेता तेथील परिस्थिी देखील चिंताजनक मानली जात आहे.

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज दहा हजाराच्या वर गेली आहे. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम व फरिदाबाद मिळून आता १० हजार ८१ रुग्ण आहेत. यात झपाट्याने रुग्ण वाढण्याचे व मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक दिल्लीतच आहे.दिल्लीच्या तुलनेत नोएडा, गुरुग्राम, गाझियाबाद आणि फरिदाबाद या शहरांमधील रुग्ण वाढण्याचे प्रमाण खूप कमी आहे. मात्र या जिल्ह्यांचा आकार लक्षात घेता तेथील परिस्थिी देखील चिंताजनक मानली जात आहे. तर त्याचवेळी रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे नोएडातील ७० टक्के प्रमाण आशादायी ठरत आहे. याठिकाणी २५३ पैकी १६७ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आज १४ भाग देखील कंटेन्मेंट झोनमधून मुक्त झाले आहेत. सध्या दिल्लीत ९ हजार ३३३, नोएडा २५३, गाझियाबाद १७२, गुरुग्राम १७९ आणि फरिदाबादमध्ये १४४ रुग्ण आहेत. राजधानी दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी चारशेहून अधिक रुग्ण आढळले आहेत. लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथीलतेच्या अपेक्षेवर असणाºया दिल्लीतील परिस्थिती मात्र ह्यजैसे थेह्ण असल्याचे चित्र आहे. गेल्या चोवीस तासांत आणखी ४३८ रुग्णांची भर पडल्यामुळे आता दहा हजाराच्या दिशेने दिल्लीची वाटचाल सुरू झाली आहे.दिल्लीमध्ये लॉकडाऊनच्या तिसºया टप्प्यात दुपटीहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. ३ मे रोजी सर्वांत पहिले चारशेहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आजपर्यंत (शनिवार) सातवेळा चारशेवर रुग्ण आढळले आहेत. त्या अनुषंगाने या सात दिवसांमध्येच जवळपास तीन हजारांच्या आसपास रुग्ण वाढले आहेत.१४, १५ आणि १६ मे असे सलग तीन दिवस चारशेवर रुग्णांची नोंद झाली. १४ मे रोजी ४७२, १५ मे रोजी ४२५ आणि १६ मे रोजी ४३८ रुग्ण आढळले म्हणजे अवघ्या तीन दिवसांत १ हजार ३३५ रुग्ण वाढले. चोवीस तासांत सर्वाधिक रुग्ण आढळण्याची घटना १४ मे रोजी नोंदविण्यात आली. ४७२ ही चोवीस तासांतील विक्रमी रुग्णसंख्या होती. याशिवाय या महिन्याच्या गेल्या पंधरा दिवसांमध्ये तीनशेवर रुग्ण आढळण्याचाही प्रसंग अनेकवेळा आला. दिल्लीत मेट्रो, बस, टॅक्सी व आॅटोरिक्षाची सेवा मर्यादित स्वरुपात येत्या काही दिवसांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या वाढणे धोकादायक मानले जात आहे. येत्या काही दिवसांत दहा हजारांचा टप्पाही दिल्लीने ओलांडलेला असणार आहे.चार कंटेन्मेंट झोन घटलेरुग्णसंख्या वाढत असताना मात्र कंटेन्मेंट झोन कमी होत आहेत. पण, ज्या ठिकाणी गेल्या चौदा किंवा २८ दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळलेला नाही, त्या भागांना कंटेन्मेंट झोनमधून मुक्त करण्यात येत आहे. असे चार भाग आज वगळण्यात आले, त्यामुळे आता दिल्लीतील कंटेन्मेंट झोनची संख्या ७७ झाली आहे. वगळण्यात आलेले तीन परिसर पश्चिम दिल्लीतील तर एक शहादरा येथील आहे. दिल्लीतील कंटेन्मेंट झोनची संख्या १०० असताना सरासरी शंभर रुग्ण वाढत होते. आज ७७ झोन असताना रुग्णांमध्ये मात्र सरासरी साडेतीनशेने वाढ होत आहे.