शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

CoronaVirus News : आरोग्य सेतू अ‍ॅपचा डेटा पूर्णपणे सुरक्षित - रविशंकर प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 7:58 PM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : आरोग्य सेतू अ‍ॅप हे भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी आहे, असे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी सांगितले.

ठळक मुद्देफ्रान्समधील हॅकर Robert Baptiste ने मंगळवारी 9 कोटी भारतीयांची माहिती उघड होण्याचा धोका आहे, असे ट्विट केले होते.

 नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यासंबंधी सर्व माहिती देणारे आरोग्य सेतू अ‍ॅप तयार केले आहे. मात्र, फ्रान्समधील हॅकर Robert Baptiste ने एक ट्विट करून आरोग्य सेतू अ‍ॅपवरून भारतीयांची माहिती उघड होण्याचा दावा केला आहे. त्यामुळे आरोग्य सेतू अ‍ॅपबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

दरम्यान, आरोग्य सेतू अ‍ॅप हे भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी आहे, असे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी सांगितले. तसेच, हे अ‍ॅप खासगी संरक्षण, सुरक्षा आणि डेटा सुरक्षिततेच्या बाबतीत पूर्णपणे मजबूत आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.

फ्रान्समधील हॅकर Robert Baptiste ने मंगळवारी 9 कोटी भारतीयांची माहिती उघड होण्याचा धोका आहे, असे ट्विट केले होते. तसेच, या हॅकर्सने आरोग्य सेतू अ‍ॅपवरुन खासगी माहिती कशाप्रकारे उघड  होते, याबाबत स्पष्ट केले नाही. मात्र, यावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून कोरोनासंदर्भातील सर्व माहिती देणारे आरोग्य सेतू अ‍ॅप सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी आरोग्य सेतू अ‍ॅपला केंद्र सरकारने लाँच केले आहे. हे अ‍ॅप सरकारचे अधिकृत कोविड-१९ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अ‍ॅप आहे. या अ‍ॅपला इन्फॉर्मेटिक्स सेंटरने विकसित केले आहे. तसेच,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला हे अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य सेतू अ‍ॅपवर कोरोना संदर्भात माहिती अपडेट करण्यात येते.

टॅग्स :Ravi Shankar Prasadरविशंकर प्रसादtechnologyतंत्रज्ञान