शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : ग्रीन झोनमध्ये दारूची दुकानं उघडणार, केंद्र सरकारची सशर्त परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 06:41 IST

ग्राहकांनी दारूच्या दुकानाबाहेर सहा फूट अंतर ठेवून रांग लावावी, अशी अटही मोदी सरकारनं घातली आहे.

नवी दिल्लीः ग्रीन झोनमध्ये दारूची दुकानं खुली ठेवण्यासाठी केंद्रानं सशर्त परवानगी दिली आहे. ग्राहकांनी दारूच्या दुकानाबाहेर सहा फूट अंतर ठेवून रांग लावावी, अशी अटही मोदी सरकारनं घातली आहे. वाइन शॉप्स आणि पानाच्या दुकानांसमोर सहा फुटांचं अंतर बंधनकारक करण्यात आलं असून, सोमवारपासून दुकानं उघडण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने दारूची दुकानं उघडण्यास सशर्त परवानगी दिली आहे. पुढील दोन आठवड्यांसाठी म्हणजेच 4 मेपासून 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्याच दरम्यान केंद्र सरकारनं ग्रीन झोनमध्ये वाइन शॉप आणि पानाची गादी सुरू करण्यास अटी अन् शर्थींवर मान्यता दिली आहे.मुंबई, पुणे व दिल्ली रेड झोनमध्ये असल्याने तेथील नागरिकांना कोणताही दिलासा मिळणार नाही. रुग्णसंख्या कमी होत जाण्यासाठी तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली. २१ एप्रिलला जारी केलेल्या मार्गदर्शिकेमुळे अनेक दुकाने उघडली होती. ग्रामीण भागातील व्यवहार पूर्वपदावर येत होते. देशात सर्वाधिक रेड झोन उत्तर प्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांत असून, ते अनुक्रमे १९ व १४ इतके आहेत. तामिळनाडूमध्ये १२, दिल्लीमध्ये ११ रेड झोन आहेत.उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर हे रेड झोनमध्ये तर गाझियाबाद ऑरेंज झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या राज्यातील रेड झोनमध्ये लखनऊ, आग्रा, सहारनपूर, कानपूर नगर, मोरादाबाद, फिरोजाबाद, बुलंदशहर, मेरठ, रायबरेली, वाराणसी, अमरोहा, संत कबीरनगर, अलिगढ, मुझफ्फरनगर, रामपूर, मथुरा व बरेली आदी विभागांचाही समावेश आहे. दिल्लीच्या एनसीआरमधील आणखी काही भाग, हरयाणातील गुरगावचा प्रदेश हे ऑरेंज झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

कोरोना साथ व लॉकडाऊन संदर्भातील देशातील स्थितीचा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नुकत्याच झालेल्या बैठकांमध्ये आढावा घेण्यात आला. लागू केलेल्या निर्बंधामुळे कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात नक्कीच यश मिळाले असल्याचे आढळून आले आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे ४ मेपासून लागू होतील. त्यानुसार काही जिल्ह्यांतील निर्बंध शिथील केले जातील. त्याची घोषणा येत्या काही दिवसांत होईल, असे केंद्रीय गृह विभागाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस