शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: अमेरिकन तज्ज्ञानं सांगितली भारताची 'ताकद'; कोरोना संकटात देशासाठी 'पॉझिटिव्ह' न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 14:59 IST

CoronaVirus News: कोरोना महामारीच्या हाताळणीवरून पाश्चिमात्य देशांनी काही दिवसांपूर्वीच भारतावर टीका केली होती

नवी दिल्ली: कोरोना महामारीची हाताळणी चुकीच्या पद्धतीनं केल्याची टीका पाश्चिमात्य माध्यमांकडून गेल्या काही दिवसांपासून भारतावर करण्यात येत आहे. जगातील अनेक प्रतिष्ठित वृत्तपत्रांनी आणि वृत्तवाहिन्यांनी भारतातील कोरोना स्थितीवरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली. यानंतर आता अमेरिकेन परराष्ट्र धोरणतज्ज्ञ डॉ. जॉन सी. हल्समन यांनी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. ते अरब न्यूजशी बोलत होते.ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्यानं कोरोना रुग्ण वैतागला, शेतात जाऊन बसला; अन् ३ दिवसांनी...भारतातील राजकीय ढाचा स्थिर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष दोन्हीही राजकीयदृष्ट्या अतिशय सुरक्षित आहेत. त्यामुळे बाकीच्या देशांना भारताबद्दल ईर्ष्या वाटते. भाजप आणि मोदी इतके सुरक्षित आहेत की इतर देश केवळ त्यांच्याबद्दल असुया बाळगू शकतात, असं मत हल्समन यांनी व्यक्त केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढल्याचा थेट परिणाम भारतातील आरोग्य यंत्रणेवर पाहायला मिळाला. आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली. त्यावरून पाश्चिमात्य माध्यमांनी भारतावर कडवी टीका केली. पण तरीही भारतातील राजकीय यंत्रणा पूर्णपणे स्थिर आहे. ती अजिबात डळमळीत झालेली नाही, असं हल्समन यांनी सांगितलं.धोका वाढला! कुत्र्यांमधूनही माणसांपर्यंत पोहोचतोय कोरोना विषाणू; नव्या माहितीनं खळबळभारतातील लोकसंख्येचं स्वरुप भारताचं बलस्थान असल्याचं हल्समन यांनी सांगितलं. 'भारतातील राजकीय यंत्रणा अतिशय मजबूत आहे. याशिवाय भारताला लोकसंख्येचादेखील फायदा मिळतो. २०२४ पर्यंत लोकसंख्येच्या बाबतीत भारतानं चीनला मागे टाकलेलं असेल. भारताची ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या २५ वर्षांखालील आहे. तर ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांच्या खाली आहे,' अशी आकडेवारी हल्समन यांनी सांगितली.भारताच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित आकडेवारी खोटी नाही. २०५० पर्यंत संपूर्ण जगाच्या जीडीपीमध्ये भारताचं योगदान १५ टक्के असेल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू वर्षात भारताच्या जीडीपी वाढीचा दर ११.५ टक्के असेल, असा अंदाज वर्तवला आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी