शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

CoronaVirus News : बापरे! 'या' राज्यात शाळा सुरू करणं पडलं महागात; 6 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 18:08 IST

CoronaVirus News : कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,23,810 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3,16,13,993 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 41,649 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 593 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,23,810 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. 

हरियाणामध्ये शाळा सुरू केल्यावर कोरोनाचा धोका वाढला आहे. फतेहाबादमध्ये सहा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या मुलांना सध्या घरी आयसोलेट करण्यात आलं आहे. सरकारी शाळेतील मुलं कोरोना संक्रमित आढळून आली आहेत. विद्यार्थी कोरोना पॉ़झिटिव्ह आढळून आल्यानंतर आता पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचं सँपल घेण्यास सांगितलं आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सर्व सरकारी आणि खासगी शाळांना विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा व्हेरिएंटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला नाही तर डेल्टा व्हेरिएंट अधिक धोकादायक ठरणार असून जीवघेणा होईल असं म्हटलं आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे परिस्थिती आणखी बिघडण्यापूर्वी त्याचा प्रसार कमी करावा लागेल. डेल्टा एक धोक्याचा इशारा आहे. हा व्हायरस पसरत आहे, पण याचे अधिक धोकादायक रूप समोर येण्यापूर्वी आपल्याला समजून घ्यावा लागेल असं देखील WHO ने म्हटलं आहे. लसीकरण मोहिमेवर अधिक जोर देणं गरजेचं आहे नाहीतर हा धोका खूप वाढेल. त्यामुळेच सप्टेंबरच्या शेवटपर्यंत सर्व देशांनी आपल्या देशातील कमीतकमी 10 टक्के लोकसंख्येचं लसीकरण करणं गरजेचं आहे असं आवाहन WHO ने केलं आहे.

कोरोना लसीकरणाचा वेग वाढला नाही तर जीवघेणा होऊ शकतो Delta Variant; WHO चा धोक्याचा इशारा

जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस यांनी याबाबत भाष्य केलं आहे. आतापर्यंत, चार चिंताजनक कोरोना व्हायरसचे प्रकार समोर आले आहेत आणि व्हायरस पसरत राहिल्याने आणखी येत राहतील. डब्ल्यूएचओच्या सहापैकी पाच क्षेत्रांमध्ये, गेल्या चार आठवड्यांत सरासरी संसर्ग 80 टक्क्यांनी वाढला आहे असं टेड्रॉस यांनी म्हटलं आहे. मायकल रायन यांनी जरी डेल्टाने अनेक देशांना हादरवून टाकले असले तरी, त्याचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी उपाय अजूनही आहेत. विशेषतः सोशल डिस्टसिंग पाळणे, मास्क घालणे, हाताची स्वच्छता याद्वारे डेल्टाचा प्रसार टाळता येऊ शकतो असं म्हटलं आहे. कोरोना व्हायरस वेगाने वाढतच आहे. कोरोनाला रोखण्यासाठी हे उपाय अजूनही काम करत आहे, पण आपल्याला आधीपेक्षा अधिक कार्यक्षम आणि अधिक प्रभावीपणे हे उपाय अंमलात आणण्याची गरज आहे" असं देखील रायन यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHaryanaहरयाणाIndiaभारत