शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ...म्हणून मोदी सरकार कोरोना लस, औषधांवर GST आकारतंय; अर्थमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 23:22 IST

CoronaVirus News: लस, औषधं, उपकरणं जीएसटीतून मुक्त करा अशी मागणी करणाऱ्या ममता बॅनर्जींना अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रत्युत्तर

नवी दिल्ली: कोरोना लस आणि कोरोनाशी संबंधित औषधांवर आकारण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवा करांवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. केंद्र सरकार कोरोना लसीवर ५ टक्के आणि ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स आणि कोरोनाच्या औषधांवर १२ टक्के कर आकारणं का गरजेचं आहे, याची माहिती देण्यासाठी सीतारामन यांनी १६ ट्विट्स केली आहेत. कोरोना लस, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स आणि कोरोनाच्या औषधांवर जीएसटी लावण्यात आल्यानं त्यांची किंमत कमी ठेवता येते, असं सीतारामन यांनी ट्विट्सच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.  देशावर कोरोनाचं भीषण संकट असताना उपचारांसाठी आवश्यक उपकरणं आणि औषधांवरील कर माफ करायला हवा, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केली होती. त्यानंतर सीतारामन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. लस आणि औषधांवरील सामान्य करामुळे उत्पादकांना इनपुट टॅक्स क्रेडिट (टॅक्स रिफंड) मिळतं.. त्यामुळे त्यांना उपकरणं आणि औषधांच्या किमती कमी राखण्यास मदत मिळते. कोरोनाच्या औषधांवरील आयात शुल्क आधीच माफ करण्यात आलं आहे, असंदेखील सीतारामन यांनी सांगितलं आहे. 'औषधं आणि जीवनरक्षक उपकरणांना करात पूर्ण सूट दिल्यास त्याचा फटका देशातील उत्पादकांसोबतच ग्राहकांनादेखील बसेल. करात पूर्ण सवलत दिल्यास उत्पादक कच्चा माल आणि अन्य सामानांवर भरत असलेल्या करावरील (जीएसटी) इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेऊ शकणार नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना कच्च्या मालावर भरलेल्या कराचा बोजा ग्राहकांवर टाकावा लागेल. कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसेल. यामुळे उत्पादनं महाग होतील,' असं सीतारामन यांनी ट्विट्समधून स्पष्ट केलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnirmala sitharamanनिर्मला सीतारामन