शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: दिलासादायक! महिनाभरात ओसरेल कोरोनाचा कहर; केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 06:46 IST

लसीकरण मोहिमेमुळेही विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात आटोक्यात

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांत घसरणीला लागलेला कोरोनाचा आलेख मागील काही दिवसांपासून पुन्हा वरचढ होऊ लागला आहे. निर्बंधांमध्ये आलेली शिथिलता त्यासाठी काही प्रमाणात कारणीभूत आहे. तरीही जगाच्या तुलनेत भारतात अजूनही कोरोनाचे प्रमाण कमीच आहे. तसेच लसीकरण मोहिमेमुळेही विषाणूचा फैलाव आटोक्यात आला आहे. 

तूर्तास कोरोनाचा आलेख चढता असला तरी मार्चच्या अखेरपर्यंत बाधितांची संख्या कमी होईल, असा दावा राजीव करंदीकर (चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट), डॉ. शेखर मांडे (सीएसआयआर मुख्यालय) आणि प्राध्यापक एम. विद्यासागर (आयआयटी, हैदराबाद) या तज्ज्ञांनी एका लेखात केला आहे. ‘द केस ऑफ रॅपिड व्हॅक्सिनेशन ऑफ इंडिया ॲण्ड रेस्ट ऑफ द वर्ल्ड’ असे या  लेखाचे शीर्षक आहे. तीनही लेखक केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्यातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या नॅशनल सुपरमॉडेल कमिटीचे सदस्य आहेत.

 लसीचा परिणाम

कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी दिल्या जात आहेत. या लसींमुळे कोरोनापासून दीर्घकाळपर्यंत संरक्षण होऊ शकते. लसीकरणामुळे लोकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढीस लागत आहे. ४० ते ८० टक्के लसीची परिणामकारकता असेल.

गाफील राहून चालणार नाही

देशात सद्य:स्थितीत कोरोनाचा पहिलाच टप्पा संपुष्टात आला आहे. दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणे बाकी असून या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी.इटली, ब्रिटन, अमेरिका यांच्याप्रमाणे भारताला गाफील राहता कामा नये

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत