शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: रामबाण औषधही फेल ठरलं; कोरोनाच्या नव्या रुपानं शास्त्रज्ञांची झोप उडवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 08:53 IST

CoronaVirus News: डेल्टाच्या नव्या म्युटंटनं धोका वाढला; शास्त्रज्ञांच्या चिंतेत भर

नवी दिल्ली: कोरोना विषाणू्चा डेल्टा व्हेरिएंट (B.1.617.2) आतापर्यंतचं सर्वाधिक संक्रामक रुप मानलं जात आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट आली. आता ही दुसरी लाट ओसरली आहे. मात्र डेल्टानं वाढवलेली चिंता कायम आहे. डेल्टा व्हेरिएंटचे जास्त म्युटेंट व्हर्जन फैलावण्याची शक्यता आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. सर्वप्रथम भारतात आढळून आलेला डेल्टा व्हेरिएंटचं म्युटेशन झालं आहे. म्युटेशन होऊन तयार झालेला डेल्टा प्लस अधिक वेगानं फैलावेल अशी भीती शास्त्रज्ञांना वाटत आहे. हा नवा म्युटंट अँटिबॉडी कॉकटेललादेखील निष्प्रभ करू शकतो. यशस्वी प्रयोग! अँटिबॉडी कॉकटेलच्या वापरामुळे 24 तासांत कोरोना लक्षणे गायब

मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल कोरोनाच्या उपचारात सर्वाधिक प्रभावी आहे. मात्र डेल्टा प्लस मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलला पुरून उरू शकतो. ब्रिटिश सरकारच्या आरोग्य आणि सामाजिक देखभाल विभागाची कार्यकारी एजन्सी पब्लिक हेल्थ इंग्लंडनं डेल्टाचे ६३ जिनोम शोधले आहेत. गेल्या शुक्रवारपर्यंत अपडेट करण्यात आलेल्या अहवालात डेल्टा प्लसबद्दल महत्त्वाची माहिती आहे. ७ जूनपर्यंत भारतात डेल्टा प्लसचे ६ रुग्ण आढळून आले असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

डेल्टाचं नवं रुप मोनोक्लोनल अँटिबॉडी औषध कॅसिरिविमाब आणि इम्डेविमाब यांना निष्प्रभ करू शकत असल्याचं पुरावे सापडल्याची माहिती दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ जीनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे डॉक्टर आणि कम्प्युटेशनल बायोलॉजिस्ट विनोद स्कारिया यांनी दिली. 'विषाणूच्या नव्या रुपाचा भारतात जास्त फैलाव झालेला नाही. आतापर्यंत देशात केवळ सहाच रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टा जसजसा विकसित होत होत आहे, तसतसा हा विषाणू अधिक म्युटेट होत आहे,' असं स्कारिया यांनी सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या