CoronaVirus: यशस्वी प्रयोग! अँटिबॉडी कॉकटेलच्या वापरामुळे 24 तासांत कोरोना लक्षणे गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 06:53 AM2021-06-14T06:53:13+5:302021-06-14T06:54:14+5:30

Monoclonal antibody treatment on Corona: हैदराबादच्या  ‘एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी’चा प्रयोग यशस्वी. कोरोनाची सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या बाधितांमध्ये मोनोक्लोनल अँटिबॉडी थेरपीचा वापर केला जातो. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही गेल्या वर्षी कोरोनाची लागण झाल्यावर याच थेरपीने उपचार घेतले होते. 

Successful experiment! Corona symptoms disappear within 24 hours with the use of antibody cocktails | CoronaVirus: यशस्वी प्रयोग! अँटिबॉडी कॉकटेलच्या वापरामुळे 24 तासांत कोरोना लक्षणे गायब

CoronaVirus: यशस्वी प्रयोग! अँटिबॉडी कॉकटेलच्या वापरामुळे 24 तासांत कोरोना लक्षणे गायब

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हैदराबाद : कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेचा जोर आता देशात ओसरत चालला आहे. देशभर लसीकरण मोहिमेनेही वेग घेतला आहे. तसेच नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध होणार आहेत. या पार्श्वभूमीवर येथील ‘एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी’ या संस्थेने ४० हून अधिक कोरोनाबाधितांवर मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलचा (Monoclonal antibody treatment) केलेला प्रयोग यशस्वी ठरल्याचे आढळून आले आहे. (Monoclonal antibody treatment is now seen as a relatively effective and safer alternative in treating COVID-19 patients)

अँटिबॉडी कॉकटेलचा डोस घेताच पहिल्याच दिवशी बाधितांमधील लक्षणे गायब झाली. यामुळे रुग्णांना कोरोनातून बरे करण्यासाठी आणखी एक चांगला पर्याय  मिळू शकणार आहे. अशा प्रकारे कोरोनावर उपचार करता येऊ शकतो याची चाचपणी गेले अनेक दिवस देशात विविध ठिकाणी सुरू होती. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या औषधाचा वापर करावा, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे असून याचा अतिवापर टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

कासिरिव्हिमॅब, इंडेव्हिमॅबचा समावेश 
n मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलचा एक डोस बाधितांना कोरोनाची लागण झाल्यावर तीन ते सात दिवसांच्या आत दिला जातो. या कॉकटेलमध्ये कासिरिव्हिमॅब आणि इंडेव्हिमॅब या दोन औषधांचा समावेश केलेला असतो. 
n भारतात या औषधाची किंमत ७० हजार रुपयांहून अधिक 
आहे. उल्लेखनीय म्हणजे किंमत अधिक असूनही या अँटिबॉडी कॉकटेलच्या मागणीत वाढ होताना दिसून येत आहे.  

मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलचा एक डोस घेतल्यानंतर २४ तासांत ४० हून अधिक कोरोनाबाधितांची ताप, अस्वस्थता, खोकला यांसारखी लक्षणे १०० टक्के गायब झाल्याचे पीसीआर चाचणीतून स्पष्ट झाले. हे औषध ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांतील कोरोना विषाणूच्या व्हेरिएंटविरोधात उत्तमरीत्या प्रभावी ठरले आहे. मात्र, भारतातील डेल्टा व्हेरिएंटवर ते प्रभावी आहे किंवा कसे, याचा अभ्यास अद्याप झालेला नाही. आम्ही जे केले तो एक प्रकारे प्रयोगच होता. 
    - डॉ. नागेश्वर रेड्डी, अध्यक्ष, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी

डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली हीच थेरपी 
कोरोनाची सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या बाधितांमध्ये मोनोक्लोनल अँटिबॉडी थेरपीचा वापर केला जातो. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही गेल्या वर्षी कोरोनाची लागण झाल्यावर याच थेरपीने उपचार घेतले होते. 

Web Title: Successful experiment! Corona symptoms disappear within 24 hours with the use of antibody cocktails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.