शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

CoronaVirus News: देशात कोरोनामुळे होणारे मृत्यू घटले; नवे रुग्णही कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 06:42 IST

सक्रिय रुग्णांची संख्या १६ लाख ३५ हजार

नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही घट होत आहे. शुक्रवारी या संसर्गामुळे २,७१३ जण मरण पावले. गुरुवारपेक्षा हा आकडा १७४ ने कमी आहे. नव्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत असून शुक्रवारी १ लाख ३२ हजार ३६४ नवे रुग्ण सापडले व २ लाख ७ हजार ७१ जण बरे झाले. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ८५ लाख ७४ हजार ३५० आहे. त्यातील २ कोटी ६५ लाख ९७ हजार ६५५ जण बरे झाले. कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ३ लाख ४० हजार ७०२ इतकी आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असून ते आता ९३.०८ टक्के झाले आहे. तर संसर्ग होण्याचे प्रमाण आता ६.५ टक्के आहे. देशामध्ये सलग ४५ व्या दिवशी दररोज २ हजारपेक्षा जास्त बळी गेले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या १६ लाख ३५ हजार ९९३ असून ती गुुरुवारपेक्षा ७७ हजार ८२० ने कमी आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. सलग २२ व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जगामध्ये १७ कोटी २९ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील १५ कोटी ५८ लाख जण बरे झाले.अमेरिका भारताला कोविड लस देणारवॉशिंग्टन : भारताला कोविड-१९ वरील जीवरक्षक लसीच्या लाखो मात्रा पाठविण्याचा निर्णय बायडेन प्रशासनाने घेतल्याची माहिती अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी फोनद्वारे दिली. हॅरिस मेक्सिको आणि गुआतेमालाच्या प्रमुखांशीही फोनवर बोलल्या. बायडेन प्रशासन जूनअखेर जगात किमान ८० दशलक्ष लस वितरित करणार आहे. त्यातील पहिल्या २५ दशलक्ष लस मात्रा या देशांना देणार आहे.जगभरात दिले दोन अब्जांपेक्षा जास्त डोसजगभरामध्ये कोरोना लसींचे दोन अब्जांपेक्षा जास्त डोस लोकांना देण्यात आले आहेत. कोरोना लसीकरणाची मोहीम जगभरात सुरू होऊन सहा महिने उलटले आहेत. जगात लसीकरणामध्ये इस्रायल आघाडीवर असून तेथील दहापैकी सहा लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या