शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

CoronaVirus News: कोवॅक्सिननं भरलेला कंटेनर बेवारस स्थितीत सापडला; चालक-वाहक दोघेही गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 11:13 AM

CoronaVirus News: कंटेनरमध्ये कोरोना लसीचे २ लाख ४० हजार डोस; हैदराबादहून पंजाबकडे निघाला होता कंटेनर

भोपाळ: देशात कोरोनानं अक्षरश: थैमान घातलं आहे. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यानं लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र देशात सर्वत्र कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. मात्र मध्य प्रदेशात लसींच्या वाहतुकीत मोठा बेजबाबदारपणा झाल्याचं उघडकीस आलं आहे. मध्य प्रदेशच्या नहसिंहपूरमधील करेली बस स्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला एक कोल्ड चेनचा कंटेनर बेवारस अवस्थेत सापडला. हा कंटेनर चालू स्थितीत होता. त्यात कोरोना लसींचे २ लाख ४० हजार डोस होते. एक कंटेनर चालू स्थितीत रस्त्याच्या कडेला बराच वेळ चालू स्थितीत उभा असल्याची माहिती करेली पोलिसांना मिळाली. या कंटेनरमध्ये चालक, वाहक उपस्थित नव्हते. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.देशात कोरोनाचा हाहाकार! पहिल्यांदाच रुग्णसंख्या ४ लाख पार; जगातील विक्रमी वाढपोलिसांनी कंटेनरमध्ये असलेली कागदपत्रं तपासली. हा कंटेनर गुरुग्रामच्या टीसीआय कोल्ड चेन सोल्युशन कंपनीच्या मालकीचा असून तो भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसींचे २ लाख ४० हजार डोस हैदराबादहून पंजाबच्या कर्नालला घेऊन जात असल्याची माहिती कागदपत्रांतून पोलिसांना समजली. कंटेनरमध्ये पोलिसांना ३६४ मोठे खोके आढळले. त्यात कोवॅक्सिन लसींचा साठा होता. त्यांची एकूण किंमत ८ कोटी रुपये इतकी होती.VIDEO: माझी आई मरेल हो...! मुलगा ओरडत राहिला; पोलिसांनी VIPसाठी ऑक्सिजन सिलिंडर हिसकावलापोलिसांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कंटेनरच्या चालकाचा मोबाईल नंबर मिळवला. यानंतर पोलिसांनी मोबाईल नंबरच्या माध्यमातून चालकाचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. चालकाचा मोबाईल नरसिंहपूर बायपासच्या पुढे असलेल्या चौपदरी मार्गाच्या शेजारी असलेल्या झुडूपांमध्ये पडलेला आढळून आला. पोलिसांना अद्याप तरी कंटेनरचा वाहक आणि चालक यांचा ठावठिकाणा सापडलेला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस