शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

CoronaVirus News : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण छत्तीसगड, केरळ, तेलंगणात सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 00:06 IST

coronavirus News in Marathi and Live Updates : भारतामध्ये ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्यांचा आकडा गुरुवारी (दि. १४) ८० हजारांपार गेला असून, आता एक लाखाच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे.

- अमोल मचालेपुणे : भारतामध्ये ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्यांचा आकडा गुरुवारी (दि. १४) ८० हजारांपार गेला असून, आता एक लाखाच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे. ही स्थिती चिंताजनक असली, तरी ५० पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या राज्यांचा विचार करता, ८ राज्यांत अर्ध्यापेक्षा अधिक रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याबाबतीत छत्तीसगड, केरळ आणि तेलंगणा ही राज्ये पहिल्या ३ क्रमांकावर आहेत.गुरुवारपर्यंत देशात एकूण ८१ हजार ९८९ रुग्ण आढळले असून, त्यापैकी २७ हजार ९६९ म्हणजे ३४.११ टक्के रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. २ हजार ६४९ नागरिकांचा मृत्यू झाला असून, एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण ३.२३ टक्के इतके आहे. राज्यांचा विचार करता, छत्तीसगडमध्ये एकूण ५९ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ५६ बरे झाले असून हे प्रमाण देशात सर्वाधिक म्हणजे तब्बल ९४.९१ टक्के इतके आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या केरळमध्ये ५६१ रुग्णांपैकी ४९३ जण म्हणजे ८७.८८ टक्के नागरिक उपचारानंतर बरे झाले आहेत. तेलंगणामध्ये ६७.३३ टक्के रुग्ण (१,४१४ पैकी ९५२) बरे झाले आहेत. या ३ राज्यांसह उत्तराखंड (६४.१०), राजस्थान (५८.१८), आंध्र प्रदेश (५४.०६), हरियाणा (५३.६७) आणि उत्तर प्रदेश (५३.१०) येथेही निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. रुग्णसंख्येत पहिल्या ३ क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र, तमिळनाडू आणि गुजरात या राज्यांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. महाराष्ट्रात २२.०१, तमिळनाडूत २३.१५, तर गुजरातमध्ये ३९.१३ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत हे प्रमाण ३५.९५ टक्के इतके आहे.पश्चिम बंगाल, गुजरात आणि मध्य प्रदेशात मृत्यूदर ५ पेक्षा जास्त नोंदला गेला आहे. बंगालमध्ये आढळलेल्या २ हजार ३७७ रुग्णांपैकी २१५ म्हणजे ९.०४ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात हा मृत्यूदरसर्वाधिक आहे. त्यानंतर गुजरातमध्ये ६.११ तर, मध्य प्रदेशात ५.३५ टक्के मृत्यूदर आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण ३.७० टक्के इतके आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण छत्तीसगड, केरळ, तेलंगणात सर्वाधिक- अमोल मचाले।पुणे : भारतामध्ये ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्यांचा आकडा गुरुवारी (दि. १४) ८० हजारांपार गेला असून, आता एक लाखाच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे. ही स्थिती चिंताजनक असली, तरी ५० पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या राज्यांचा विचार करता, ८ राज्यांत अर्ध्यापेक्षा अधिक रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याबाबतीत छत्तीसगड, केरळ आणि तेलंगणा ही राज्ये पहिल्या ३ क्रमांकावर आहेत.गुरुवारपर्यंत देशात एकूण ८१ हजार ९८९ रुग्ण आढळले असून, त्यापैकी २७ हजार ९६९ म्हणजे ३४.११ टक्के रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. २ हजार ६४९ नागरिकांचा मृत्यू झाला असून, एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण ३.२३ टक्के इतके आहे. राज्यांचा विचार करता, छत्तीसगडमध्ये एकूण ५९ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ५६ बरे झाले असून हे प्रमाण देशात सर्वाधिक म्हणजे तब्बल ९४.९१ टक्के इतके आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या केरळमध्ये ५६१ रुग्णांपैकी ४९३ जण म्हणजे ८७.८८ टक्के नागरिक उपचारानंतर बरे झाले आहेत. तेलंगणामध्ये ६७.३३ टक्के रुग्ण (१,४१४ पैकी ९५२) बरे झाले आहेत. या ३ राज्यांसह उत्तराखंड (६४.१०), राजस्थान (५८.१८), आंध्र प्रदेश (५४.०६), हरियाणा (५३.६७) आणि उत्तर प्रदेश (५३.१०) येथेही निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. रुग्णसंख्येत पहिल्या ३ क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र, तमिळनाडू आणि गुजरात या राज्यांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. महाराष्ट्रात २२.०१, तमिळनाडूत २३.१५, तर गुजरातमध्ये ३९.१३ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत हे प्रमाण ३५.९५ टक्के इतके आहे.पश्चिम बंगाल, गुजरात आणि मध्य प्रदेशात मृत्यूदर ५ पेक्षा जास्त नोंदला गेला आहे. बंगालमध्ये आढळलेल्या २ हजार ३७७ रुग्णांपैकी २१५ म्हणजे ९.०४ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात हा मृत्यूदरसर्वाधिक आहे. त्यानंतर गुजरातमध्ये ६.११ तर, मध्य प्रदेशात ५.३५ टक्के मृत्यूदर आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण ३.७० टक्के इतके आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या