शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: लसींच्या किमतीविषयी केंद्राची कंपन्यांकडे विचारणा, तीन लसींच्या चाचण्यांवर बारीक लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 06:59 IST

तशी विचारणा या लसींच्या निर्मात्यांना करण्यात आली आहे. लसींची किंमत लोकांना परवडणारी असावी, असा सरकारचा कटाक्ष आहे.

नवी दिल्ली : भारतामध्ये सध्या तीन कोरोना प्रतिबंधक लसींच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. त्या लसी बनविणाऱ्या संस्था प्रत्येक लस किती रुपयांना उपलब्ध करून देणार याची विचारणा त्यांच्याकडे केंद्र सरकारने केली आहे. हैदराबाद येथील भारत बायोटेक व अहमदाबाद येथील झायडस कॅडिला या कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांचा पहिला व दुसरा टप्पा सध्या सुरू आहे. आॅक्सफर्ड व अ‍ॅस्ट्राझेनिसा संयुक्तरीत्या विकसित करीत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या भारतात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी सांगितले की, तिन्ही कोरोना प्रतिबंधक लसींच्या चाचण्यांच्या प्रगतीवर केंद्र सरकारचे लक्ष आहे. लसी किती रुपयांना उपलब्ध होणार, हा मुद्दा आहे. त्यामुळे तशी विचारणा या लसींच्या निर्मात्यांना करण्यात आली आहे. लसींची किंमत लोकांना परवडणारी असावी, असा सरकारचा कटाक्ष आहे.>आॅस्ट्रेलियातील नागरिकांना लस मोफतकोरोना प्रतिबंधक लस तयार झाल्यानंतर आॅस्ट्रेलियातील प्रत्येक नागरिकाला ती मोफत दिली जाईल, असे त्या देशाने जाहीर केले आहे.आॅक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने अ‍ॅस्ट्राझेनिसा कंपनी कोरोना प्रतिबंधक लस तयार करीत असून, आॅस्ट्रेलियाने या कंपनीशी लस मिळण्याबाबत करार केला आहे.आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितले की, कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात यश आल्यास तिचे आम्ही उत्पादन करणार आहोत. या लसीचे आॅस्ट्रेलियातील २.५ कोटी नागरिकांना वितरण करण्यात येईल. या देशात आतापर्यंत २३ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ४३० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस