शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

CoronaVirus News: मी देशासाठी मरतो, पण माझ्या पत्नीला उपचार मिळेनात; BSF जवानाचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 11:37 IST

CoronaVirus News: कोरोना पॉझिटिव्ह पत्नीला उपचार मिळेनात; बीएसएफ जवानाची वणवण भटकंती

रिवा: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ९५ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. देशातील अनेक राज्यांमधील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. रुग्ण नातेवाईकांसह रुग्णालयांबाहेर उपचारांसाठी प्रतीक्षा करत आहेत. मात्र त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. मध्य प्रदेशातल्या रिवा जिल्ह्यातील एका जवानाचा व्हिडीओ समोर आला आहे. सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या जवानाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. जवान आपल्या पत्नीला घेऊन वणवण फिरत आहे. मात्र बेड मिळत नाही.देशातील ऑक्सिजनचा साठा गेला कुठे?; मोदी सरकारचा निर्णय पाहून तुम्हालाही धक्का बसेलबीएसएफ जवान कोरोनाग्रस्त पत्नीला घेऊन कारमधून एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात फिरत आहे. आठ तासांपासून त्याची वणवण सुरू आहे. पत्नीला कुठे दाखल करावं, याची माहिती कोणीही जवानाला देत नाहीए. येणाऱ्या जाणाऱ्यांकडे जवान मदत मागत आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींकडे त्यानं आपली व्यथा मांडली. त्यानंतर काही माध्यम प्रतिनिधींनी त्याला मदत केली. त्यानंतर त्याच्या पत्नीला संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.तब्बल ५०० कोरोना रुग्णांचा जीव होता संकटात; अखेरच्या काही मिनिटांत घडला चमत्कारचार दिवसांपूर्वीच परतला जवानपत्नीला कोरोनाची लागण झाल्यानं त्रस्त असलेला जवान अवघ्या चारच दिवसांपूर्वी घरी परतला. त्याआधी तो त्रिपुरामध्ये कर्तव्य बजावत होता. जवानानं कोरोनाची लस घेतली आहे. तो घरी आल्यावर पत्नीची प्रकृती बिघडली. तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मंगळवारी सकाळी पत्नीला रुग्णालयात दाखव करण्यासाठी त्याची वणवण सुरू होती. मात्र अनेक रुग्णांमध्ये जाऊनही त्याला मदत मिळाली नाही. पत्नीला कारमध्ये ठेवून तो प्रत्येक रुग्णालयात जाऊन विचारणा करत होता. मात्र त्याच्या पदरी निराशाच पडली.'मुन्नाभाई'लाही लाजवेल अशी वेळ; कोरोना रुग्ण बेड घेऊन हॉस्पिटलबाहेर आलाकोरोनाबाधित पत्नीला उपचार मिळत नसल्यानं, बेड उपलब्ध होत असल्यानं जवान अतिशय हतबल झाला होता. माध्यम प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्याला अश्रू अनावर झाले. 'आजारी पत्नीला घेऊन मी भटकत आहे. तिला कुठे उपचार मिळतील? तिला मी कुठे दाखल करू? मी देशासाठी मरतो. पण माझ्या पत्नीला उपचार मिळत नाहीएत,' असं म्हणत जवानानं आक्रोश केला. मध्य प्रदेशातल्या अनेक शहरांमध्ये सध्या अशीच स्थिती आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या