शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : रॅपिड अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट कीटस्वरील बंदीचे गूढ कायम; स्वीत्झर्लंड, दक्षिण कोरियातूनही मागवले होते कीटस्

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 01:24 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : चीनच्या दोन कंपन्यांकडून आयात करण्यात आलेल्या रॅपिड अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट कीटस्च्या वापर करण्यावर आयसीएमआरने मागच्या महिन्यात बंदी घातली होती. तथापि, या बंदीभोवती गूढ वाढत आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला की नाही? याची जलदगतीने चाचणी करून निदान करण्यास सक्षम असलेल्या रॅपिड अ‍ॅन्टीबॉडी टेस्टचा (जलद प्रतिद्रव्य चाचणी) अवलंब करण्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) होत असलेल्या दिरंगाईबाबत आरोग्यतज्ज्ञ आश्चर्यचकित आहेत. चीनच्या दोन कंपन्यांकडून आयात करण्यात आलेल्या रॅपिड अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट कीटस्च्या वापर करण्यावर आयसीएमआरने मागच्या महिन्यात बंदी घातली होती. तथापि, या बंदीभोवती गूढ वाढत आहे.आयसीएमआरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, चीनच्या रॅपिड अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट कीटस्च्या निष्कर्षाचे विश्लेषणासह मूल्यांकन केले जात आहे. राजस्थान आणि अन्य काही राज्यांत करण्यात आलेल्या चाचण्यांच्या निष्कर्षाचा फेरआढावा घेतला जात आहे.चीनमधून आयात करण्यात आलेले रॅपिड अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट कीटस् सदोष आढळल्याने अन्य देशांंतून मागविण्यात आलेल्या टेस्ट कीटस्चा वापर का केला जात नाही? असे विचारले असता या अधिकाºयाने सांगितले की, रॅपिड अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट कीटस्च्या सर्व पैलंूनी आम्ही विश्लेषण करीत आहोत. तथापि, त्यांनी अधिक तपशील सांगण्याचे टाळले.अडीचशे ते साडेचारशे रुपये किमतीच्या टेस्ट कीटस्च्या माध्यमातून २५० लोकांची चाचणी करून तीस मिनिटांत निष्कर्ष देणाºया रॅपिड अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट कीटस्चा मात्र जगभरात सर्वत्र वापर केला जात आहे. भारतात मात्र बंदी घालण्यात आल्याबद्दल आरोग्यतज्ज्ञ आश्चर्य व्यक्त करतात.आरोग्यतज्ज्ञांच्या मते बंदीच्या निर्णयाने एका अर्थाने जलद चाचणी आणि कोरोनाविरोधी लढ्याच्या क्षमतेशी तडजोडच करण्यात आली. पन्नास दिवस उलटूनही आयसीएमआर मात्र रॅपिड अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट कीटस्च्या मुद्यावर काहीही बोलतनाही.सूत्रांनुसार चीनला दुखविण्याची सरकारची इच्छा नाही. भारतातील चीनच्या दूतावासानेही सदोष चाचणी निष्कर्षासाठी कीटस्ला दोषी ठरविण्यात आल्याचा तीव्र निषेध नोंदविला होता. रॅपिड अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट कीटस्चा मुद्दा गुंडाळल्याने या कीटस्च्या वापरावरील बंदीभोवतीचे गूढ मात्र आणखीच वाढत आहे.प्रकरण काय?1 हे टेस्ट कीटस् खरेदी करण्यासाठी आयसीएमआरने २४ मार्च रोजी जागतिक पातळीवर निविदा मागावल्या होत्या. दोन चिनी वितरक कंपन्यांच्या माध्यमातून ५ लाख कीटस् खरेदी करण्यात आले होते.2 राज्यांनाही हे विहित कीटस् खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली होती. अनेक राज्यांनी चीन, दक्षिण कोरिया आणि स्वीत्झर्लंडकडून कीटस् खरेदी केली होते; परंतु राजस्थान आणि अन्य ठिकाणी ६ एप्रिल रोजी अचानक चिनी कीटस् सदोष आढळल्याने चाचणीसाठी कीटस्चा वापर थांबविण्यात आला होता.3 फक्त चीनच नव्हे, तर अन्य देशांतून मागविण्यात आलेल्या कीटस्च्या वापरावर आयसीएमआरने बंदी घातली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या