CoronaVirus News : स्थलांतरित मजुरांचीही करा चाचणी, ‘आयसीएमआर’चे नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 07:09 AM2020-05-20T07:09:35+5:302020-05-20T07:10:12+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोणाची कोरोना चाचणी प्राधान्याने करावी, या विषयीच्या नियमांत आयसीएमआरने सोमवारी बदल केला आहे. विविध ठिकाणांहून स्वत:च्या राज्यांत परतलेल्या स्थलांतरित मजुरांची आवश्यकता भासल्यास त्वरित कोरोना चाचणी करावी, असे या नव्या नियमात म्हटले आहे.

CoronaVirus News : Also test migrant workers, new ICMR rules | CoronaVirus News : स्थलांतरित मजुरांचीही करा चाचणी, ‘आयसीएमआर’चे नवे नियम

CoronaVirus News : स्थलांतरित मजुरांचीही करा चाचणी, ‘आयसीएमआर’चे नवे नियम

Next

नवी दिल्ली : विविध ठिकाणांहून आपापल्या राज्यांत परतलेले स्थलांतरित मजूर, कोरोनाची लक्षणे दिसत असल्यामुळे रुग्णालयांत दाखल करण्यात आलेल्या व्यक्ती, रुग्णसेवा करणारे वैद्यकीय कर्मचारी, अशा सर्वांची कोरोना चाचणी प्राधान्याने करण्यात यावी, असे इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने आपल्या नव्या नियमांत म्हटले आहे.
कोणाची कोरोना चाचणी प्राधान्याने करावी, या विषयीच्या नियमांत आयसीएमआरने सोमवारी बदल केला आहे. विविध ठिकाणांहून स्वत:च्या राज्यांत परतलेल्या स्थलांतरित मजुरांची आवश्यकता भासल्यास त्वरित कोरोना चाचणी करावी, असे या नव्या नियमात म्हटले आहे.
कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले लोक, देशातल्या विविध हॉटस्पॉटमध्ये ज्यांना कोरोनासदृश लक्षणे जाणवत आहे, असे लोक, मोठ्या निवारा छावण्यांतील स्थलांतरित मजूर, विदेशातून आलेले लोक, आरोग्यसेवक यांची कोरोना चाचणी प्राधान्याने करावी, असे आयसीएमआरच्या आधीच्या नियमांत म्हटलेले होते. त्या नियमांत आता बदल झाला आहे.
रुग्णालयात दाखल असलेल्या व इन्फ्लूएंझासारखी लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांची तातडीने कोरोना चाचणी करावी, असे आयसीएमआरने नव्या नियमांत म्हटले आहे, अशा रुग्णांमध्ये स्थलांतरित मजुरांचा समावेश असू शकतो, असाही उल्लेख नव्या नियमांत आहे.
कोरोना रुग्णांच्या निकट संपर्कात आल्यास वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही या विषाणूची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा कर्मचाºयांचीही प्राधान्याने कोरोना चाचणी करावी. एखाद्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांपैकी संसर्ग झालेले पण त्याची कोणतीही लक्षणे आढळून न येणारे लोकही आढळून येतात, अशा लोकांची रुग्णाच्या संपर्कात आल्यापासून पाचव्या व दहाव्या दिवसाच्या दरम्यान एकदा कोरोना चाचणी करावी. याआधी ही चाचणी पाचव्या व चौदाव्या दिवसांच्या दरम्यान करण्यात येत असे.

काय आहेत आदेश?
- कार्यालयाच्या ठिकाणी कोरोनाचे एक किंवा दोन रुग्ण आढळून आले, तर हे रुग्ण त्याआधीच्या ४८ तासांत जिथे जिथे गेले असतील तेवढ्याच भागाचे निर्जंतुकीकरण करावे असे केंद्रीय आरोग्य विभागाने नव्या आदेशात म्हटले आहे.
- रुग्ण आढळून आल्यामुळे आॅफिसची सर्व इमारत सील करण्याची किंवा काम थांबविण्याची अजिबात आवश्यकता नाही. इमारतीत निर्जंतुकीकरण प्रक्रिया नीट पार पडून ती पुन्हा वापरास योग्य असल्याचे संबंधित यंत्रणांनी सांगेपर्यंत सर्व कर्मचाºयांनी घरूनच काम करावे, असेही या नियमावलीत म्हटले आहे.
- रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना १४ दिवस घरी क्वारंटाईनमध्ये ठेवावे. या काळात त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवण्यात यावे, असाही उल्लेख या नियमांत आहे.

Web Title: CoronaVirus News : Also test migrant workers, new ICMR rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.