शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

CoronaVirus News: कोरोनावरील चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक आज, 'या' मुद्द्यावर होऊ शकते चर्चा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 4, 2020 09:26 IST

विशेष म्हणजे, तीन कृषी कायद्यांच्या मुद्यावरून गेल्या सात दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असतानाच ही सर्वपक्षीय बैठक होत आहे.

ठळक मुद्देया बैठकीत कोरोना लशीच्या योजनेसंदर्भात चर्चा होणार आहे.कोरोना लशीसंदर्भातील या सर्वपक्षीय बैठकीत अनेक विरोधी पक्षातील नेते भाग घेण्याची शक्यता आहे.एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवारही या बैठकीत भाग घेण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवार) देशातील कोरोना स्थितीसंदर्भात सर्वपक्षीय बैठक होणार आहे. यावेळी भविष्यातील कोरोना लसीच्या वितरणासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने ही बैठक होईल. यात अनेक पक्षांच्या नेत्यांचा सहभाग असेल. यापूर्वी देशातील कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा एकदा वेगाने होणारी वाढ लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने बैठक घेतली होती.

विशेष म्हणजे, तीन कृषी कायद्यांच्या मुद्यावरून गेल्या सात दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असतानाच ही सर्वपक्षीय बैठक होत आहे. मात्र, या बैठकीत कोरोना लशीच्या योजनेसंदर्भात चर्चा होणार आहे.

या नेत्यांचा असेल समावेश -कोरोना लशीसंदर्भातील या सर्वपक्षीय बैठकीत अनेक विरोधी पक्षातील नेते भाग घेण्याची शक्यता आहे. यात -- बीजू जनता दलचे चंद्रशेखर साहू- YSRCP से विजयसाई रेड्डी आणि मिथून रेड्डी- AIMIMचे इम्तियाज जलील- शिवसेनेचे विनायक राऊत- जेडीयूचे आरसीपी सिंह- काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आजाद- टीएमसीचे सुदीप बंद्योपाध्याय आणि डेरेक ओ' ब्रायन- AIADMKचे नवनीत कृष्णन- DMKचे TRK बालू आणि तिरुचि शिवा - जेडीएसचे एचडी देवेगौडा- एनसीपीचे शरद पवार - समाजवादीपक्षाचे राम गोपाल यादव- बसपाचे सतीश मिश्रा- राष्ट्रीय जनता जलाचे प्रेम चंद्र गुप्ता- टीडीपीचे जय गल्ला- AAPचे संजय सिंह - TRSचे नाम नागेश्वर राव- लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान- अकाली दलाचे सुखबीर बादल

दिल्लीत गुरुवारी कोरोनामुळे 82 जणांचा मृत्यू - देशाची राजधानी दिल्ली येथे गुरुवारी 3,734 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 82 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दिल्लीत 9,424 जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिल्ली येथे गुरुवारी सक्रीय रुग्णांची संख्या 30,302 वरून 29,120 वर आली आहे. संपूर्ण देशाचा विचार करता एकूण करोनाबाधितांची संख्या 95 लाखच्याही पुढे गेली आहे. तर 1.40 लाखांच्या जवळपास लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रdelhiदिल्ली