शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus News : अहमदाबादेत आठवड्यात आढळले ७०० कोरोना रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 01:16 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोनाची लागण रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अहमदाबादमध्ये ७ मे ते १४ मे या कालावधीत दूध व औषधांची विक्री करणारी दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता.

अहमदाबाद : येथे भाजी व औषधे अशा वस्तूंची विक्री करणाऱ्या सुमारे ७०० जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे एका आठवड्यात केलेल्या तपासणीत आढळून आले. गुजरातमधील रुग्णांची संख्या ११ हजारांजवळ पोहोचली असून, अहमदाबादेत रुग्णांची संख्या ८१४४ झाली आहे.कोरोनाची लागण रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अहमदाबादमध्ये ७ मे ते १४ मे या कालावधीत दूध व औषधांची विक्री करणारी दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. भाजीविक्रेते, किराणा सामान, दूधविक्री करणारे, पेट्रोल पंपावरील कर्मचारी, कचरासेवक कामगार आदी लोकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्यामुळे झपाट्याने हा आजार आणखी पसरेल हे सरकारच्या लक्षात आले होते. त्यामुळे अहमदाबादमधील अशा लोकांपैकी सुमारे ३३,५०० लोकांचे आठवडाभरात स्क्रीनिंग करण्यात आले व त्यातील १२,५०० लोकांची कोरोनाविषयक चाचणी करण्यात आली. त्यातून सुमारे ७०० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले.एकाच आठवड्यात कोरोनाचे इतके रुग्ण शहरात आढळून आल्याने १५ मे रोजी अहमदाबादमधील दुकाने उघडण्यास काही अटींवरच परवानगी देण्यात आली. ज्यांचे स्क्रीनिंग झाले आहे, अशा भाजी, दूध, औषध, किराणा माल विक्रेत्यांनाच दुकाने उघडण्यास मंजुरी दिली आहे. या दुकानदारांना त्यांचे स्क्रीनिंग झाल्याचे कार्ड देण्यात आले आहे.गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव गुप्ता यांच्याकडे अहमदाबादमधील कोरोनास्थितीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अहमदाबादमध्ये आठवडाभरात इतक्या मोठ्या प्रमाणावर दुकानदार, फेरीवाल्यांचे स्क्र ीनिंग होण्याआधी, शहरात २० एप्रिलपासून केलेल्या चाचण्यांत या व्यावसायिकांमध्ये ३५० कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. यासंदर्भात राजीव गुप्ता यांनी सांगितले की, या दुकानदारांचा लोकांशी सतत संपर्क येत असतो. एखाद्या दुकानदाराला कोरोनाची लागण झाली असल्यास त्यामुळे अनेकांना त्याची बाधा होण्याची शक्यता असते. म्हणूनच त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या.अहमदाबादमध्ये दूध, भाजीपाल्यासह अन्य जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत आहे. जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला, फळविक्रेत्यांना आपले दुकान दररोज सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेतच उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. अहमदाबाद येथे कोरोनाचा प्रादुर्भाव दहा भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाला आहे. तिथेही काही तास दुकाने उघडी ठेवता येणार आहेत.स्क्रीनिंग केलेल्यांकडूनच वस्तू विकत घ्याकोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी ज्यांचे स्क्रीनिंग झाले आहे , अशा दुकानदारांकडूनच जनतेने वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव गुप्ता यांनी केले आहे. स्क्र ीनिंग झालेले दुकानदार, फेरीवाल्यांनी त्यासंदर्भातील आपले कार्ड दर चौदा दिवसांनी नव्याने बनवून घेणे बंधनकारक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या