शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

CoronaVirus News: प्रादुर्भाव वाढला! एका दिवसात वाढले १७ हजार २९६ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 4:02 AM

काही देशांत रुग्णांची संख्या भारतापेक्षा बरीच कमी आहे, पण तिथे मरण पावलेल्यांचा आकडा खूपच अधिक आहे.

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत १७ हजार २९६ रुग्ण आढळले असून, एका दिवसात इतके रुग्ण वाढण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. त्यामुळे एकूण कोरानाबाधितांचा आकडा आता ४ लाख ९0 हजार ४0१ झाला असून, आतापर्यंत या आजाराने १५ हजार ३0१ जण मरण पावले आहेत.रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत असून, हाच वेग कायम राहिल्यास शनिवार सकाळपर्यंत देशातील रुग्णांची संख्या ५ लाखांहून अधिक झालेली असेल. जगात अमेरिका, रशिया, ब्राझील या देशांनंतर सर्वाधिक रुग्ण भारतामध्ये आहेत. काही देशांत रुग्णांची संख्या भारतापेक्षा बरीच कमी आहे, पण तिथे मरण पावलेल्यांचा आकडा खूपच अधिक आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात ४0७ रुग्ण मरण पावले. देशात १ जूनपासून आतापर्यंत २ लाख ९९ हजार ८६६ म्हणजेच सुमारे तीन लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून रोज १0 हजारांहून अधिक रुग्ण दिसून येत होते. तिसºया आठवड्यांनंतर दरदिवशी १४ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आहे. पण आतापर्यंत १७ हजारांचा आकडा कधीच ओलांडला नव्हता. आतापर्यंतच्या एकूण रुग्णांपैकी २ लाख ८५ हजार ६३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, सध्या १ लाख ८९ हजार ४६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ५८. २४ टक्के असून, मृत्युदर जगातील अनेक देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. गेल्या २४ तासांत मरण पावलेल्यांपैकी १९२ जण महाराष्ट्रातील आहेत. राज्यात आतापर्यंत ६९३१ जण कोरोनाचे बळी ठरले आहेत.>तमिळनाडूत मृत्युदर कमीदेशात सर्वाधिक रुग्णही महाराष्ट्रामध्येच आहेत. त्याखालोखाल दिल्ली, तमिळनाडू व गुजरात यांचा क्रमांक लागतो. दिल्ली व तमिळनाडूमध्ये ७0 हजारांहून अधिक, तर गुजरातमध्ये २९ हजार ५00 रुग्ण आहेत. दिल्लीमध्ये आतापर्यंत २४२९, गुजरातमध्ये १७५३, तर तमिळनाडूमध्ये ९११ जण मरण पावले आहेत. एकूण रुग्णांच्या तुलनेत तमिळनाडूचा मृत्युदर गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश यांच्यापेक्षा बराच कमी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या