शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

CoronaVirus News : देशात १०,०३,८३२ कोरोना रुग्ण, मृत्युदर २.५ टक्क्क्यांवर, २४ तासांत ३४,९५६ नवे बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 07:19 IST

CoronaVirus News : आतापर्यंत कोरोनाने मरण पावलेल्यांची संख्या २५ हजार ६०२ झाला असला तरी एकूण रुग्णांच्या तुलनेत देशातील मृत्युदर २.५ टक्के इतका खाली आला आहे, ही समाधानाची बाब आहे.

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३४,९५६ नवे रुग्ण आढळून आले असून ही आजवरची सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या १० लाखांवर गेली असली तरी त्यापैकी 6 लाख 35 हजर जण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाने मरण पावलेल्यांची संख्या २५ हजार ६०२ झाला असला तरी एकूण रुग्णांच्या तुलनेत देशातील मृत्युदर २.५ टक्के इतका खाली आला आहे, ही समाधानाची बाब आहे.शुक्रवारी आणखी एक विक्रम नोंदविला गेला तो म्हणजे कोरोनाच्या आजारातून २२,९४२ जण पूर्णपणे बरे झाले. या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६,३५,७५७झाली असून ३,४२,४७३ कोरोना रुग्णांवरच सध्या उपचार सुरू आहेत. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६३.३३ टक्के इतके आहे.कमी बुद्धीचे लोक घालत नाहीत मास्ककोरोनापासून बचावासाठी मास्क लावणे, सतत हात धुणे आणि फिजिकल डिस्टंसिंग या गोष्टी आवश्यक आहेत. पण जे लोक या गोष्टी पाळत नाहीत त्यांची बौद्धीक क्षमता कमी असते.म्हणजे ते कमी बुद्धीमान असतात, असा निष्कर्ष यूनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्नियाच्या रिसर्चमधून करण्यात आला. अशा लोकांकडे चूक किंवा योग्यचा निर्णय घेण्याची मानसिक क्षमता नसते, असेही हा रिसर्च म्हणतो. या रिसर्चसाठी अमेरिकेतील ८५० लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.राज्यात नऊ जिल्ह्यांत ९३ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्णमुंबई : कोरोनाचा केंद्रबिंदू आता मुंबईकडून अन्य महानगरांकडे सरकत आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत ठाण्यापाठोपाठ आता पुण्यानेही मुंबईला मागे टाकले आहे. एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी १ लाख १२ हजार ३३६ रुग्ण राज्यातील नऊ जिल्ह्यांत असून उर्वरित सर्व जिल्ह्यांत मिळून फक्त ८१४४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात ८,३०८ नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.६४० पैकी ६२७ जिल्ह्यांमध्ये रुग्णलॅन्सेट ग्लोबलच्या अहवालानुसार देशाचा ९८ टक्के भाग कोरोनाच्या विळख्यात असून, ६४० जिल्ह्यांपैकी ६२७जिल्ह्यांमध्ये रुग्ण आहेत.कोरोनाचा फैलाव वाढलेल्या भागांत लॉकडाऊन किंवा अन्य निर्बंध लागू करणे आवश्यक आहे, असेलॅन्सेटने म्हटले आहे.मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा व गुजरात या ९ राज्यात स्थिती चिंताजनक आहे. ईशान्य भारतामधील स्थिती तुलनेने चांगली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य