शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

CoronaVirus News: कोरोनाचा नवा स्ट्रेन हातपाय पसरतोय; २० भारतीयांमध्ये लक्षणं दिसल्यानं चिंतेत भर

By कुणाल गवाणकर | Published: December 30, 2020 12:07 PM

CoronaVirus News: कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे आरोग्य विभाग हाय अलर्टवर

नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आता भारतात हातपाय परत असल्याचं दिसू लागलं आहे. ब्रिटनहून आलेल्या २० प्रवाशांमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. याआधी काल दिवसभरात देशाच्या विविध भागांमध्ये ६ जणांना नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे आरोग्य विभागाची धाकधूक वाढली आहे. त्यातच ब्रिटनहून आलेल्या अनेक प्रवाशांशी संपर्क होत असल्यानं चिंतेत भर पडली आहे.कोरोनाच्या नव्या स्ट्रेननं टेन्शन वाढवलं; मोदी सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णयदेशाच्या विविध भागांमध्ये नव्या स्ट्रेनचे रुग्णपश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात नव्या स्ट्रेनची लागण झालेला कोरोना रुग्ण आढळून आला आहे. ब्रिटनहून आलेल्या एका व्यक्तीमध्ये नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळून आली आहेत. त्याला क्वारंटिन करण्यात आलं आहे. जीनॉम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून या प्रवाशाची माहिती प्रशासनाला मिळाली. तो गेल्याच आठवड्यात ब्रिटनहून परतला आहे.कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी राज्यात ७ जणांमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळून आल्याची माहिती दिली. यातील ३ जण बंगळुरूचे, तर ४ जण शिमोगाचे रहिवासी आहेत. या ७ जणांच्या संपर्कात आलेल्या काही जणांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. भय इथले संपत नाही! 2 वर्षांच्या चिमुकलीमध्ये आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेनकाल उत्तर प्रदेशातल्या मेरठमधील एका २ वर्षीय मुलीला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची बाधा झाल्याचं समोर आलं. या चिमुरडीचं कुटुंब नुकतंच ब्रिटनमध्ये परतलं आहे. त्यानंतर चिमुकलीसह तिचे आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. मात्र तिघांपैकी केवळ लहान मुलीमध्येच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या