शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

coronavirus: सौम्य आणि लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांसाठी सरकारची नवी नियमावली, करावे लागेल या सूचनांचे पालन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 17:25 IST

coronavirus in India : देशात सापडत असलेल्या कोरोनाबाधितांपैकी बहुतांश कोरोनाबाधित हे सौम्य लक्षणे असणारे तसेच लक्षणे नसलेले आहेत. आता अशा कोरोनाबाधितांसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाने आज नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे.

ठळक मुद्देसौम्य आणि लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाने आज नवी नियमावली प्रसिद्ध केली ज्या कोरोनाबाधितांमध्ये सौम्य लक्षणे आहेत वा लक्षणे दिसत नाही आहेत, अशा रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहावे लागेलअशा रुग्णांच्या संपर्कात असलेल्यांना होम क्वारेंटाइन व्हावे लागेल

नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. (coronavirus in India) मात्र यापैकी बहुतांश कोरोनाबाधित हे सौम्य लक्षणे असणारे तसेच लक्षणे नसलेले आहेत. आता अशा कोरोनाबाधितांसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाने आज नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे. या नियमावलीनुसार ज्या कोरोनाबाधितांमध्ये सौम्य लक्षणे आहेत वा लक्षणे दिसत नाही आहेत, अशा रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. तसेच अशा रुग्णांच्या संपर्कात असलेल्यांना होम क्वारेंटाइन व्हावे लागेल. (New guidelines issued by the government for mild and asymptomatic corona patients, must be followed)

केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार अशा कोरोनाबाधित रुग्णावर घरीच उपचार करावे लागतील. तसेच बाधित व्यक्तीच्या कुटुंबीयांनी सातत्याने डॉक्टरांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांसाठीची नियमावली पुढील प्रमाणे आहे. 

- ज्या रुग्णांना एचआयव्ही, कॅन्सरसारखे गंभीर आजार असतील किंवा अवयव प्रत्यारोपण झाले असेल अशा रुग्णांनी होम आयसोलेशनमध्ये राहण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- जे रुग्ण ६० वर्षांवरील वयाचे आहे. तसेच ज्यांना सहव्याधी आहेत त्यांनीसुद्धा होम आयसोलेट होण्याचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांची परवानगी घ्यावी. - कुटुंबातील जी व्यक्ती रुग्णाची काळजी घेईल. तसेच त्याचा निकट संपर्कात असेल अशांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रोटोकॉलनुसार एचसीक्यू घ्यावे लागेल.- होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या रुग्णांना क्रॉस व्हेंटिलेशन असलेल्या खोलीत ठेवावे. तसेच खोलीची खिडकी उघडी ठेवावी. तसेच रुग्णाने नेहमी ट्रिपल लेअर मास्क वापरावा. तसेच हा मास्क दर आठ तासांनी बदलावा.-रुग्णाची देखभाल सुरू असलेल्या खोलीत प्रवेश करताना संबंधित व्यक्तीने एन-९५ मास्क वापरला पाहिजे. मास्क बदलायचा असेल तर तो १ टक्का सोडियम हायपोक्लोराइटसोबत मास्क डिस इन्फेक्ट केल्यावर तो फेकून द्यावा. - होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या रुग्णाच्या भोजनात अधिकाधिक पातळ पदार्थांचा समावेस करावा. तसेत घरी राहणाऱ्यांना अधिकाधिक आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. - ब्लड ऑक्सिजन सेचुरेशनला मॉनिटर करण्यासाठी प्लस ऑक्सिमीटरचा वापर करणे अनिवार्य आहे. त्यासह दररोज दर चार तासांनी शरीराचे तापमान तपासणे आवश्यक आहे. - रुग्णाला एकाच खोलीत राहावे लागेल. तसेच त्याने कुटुंबातील अन्य व्यक्तींपासून आवश्यक अंतर ठेवणे आवश्यक आहे. तसेच त्याने वयस्कर आणि आजारी व्यक्ती आपल्या संपर्कात येणार नाहीत, याची विशेष खबरदारी घेतली पाहिजे. - रुग्णाने अधिकाधिक आराम करावा. तसेच शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे. रुग्णाने खोकताना तसेच शिंकताना विशेष खबरदारी घ्यावी. प्रत्येकवेळी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. - रुग्णाने दिवसातून दोनवेळा कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात. तसेच वाफ घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. - रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल, ऑक्सिजनची पातळी ९४ टक्क्यांच्या खाली आली असेल, छातीत वेदना होत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - कोरोनाचे लक्षण समोर आळ्यानंतर किमान दहा दिवसांनंतर होम आयसोलेशन संपुष्टात आणण्यात येऊ शकते. मात्र सलग तीन दिवस ताप येत नसेल तरच असा निर्णय घेता येऊ शकतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारत