शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

coronavirus: ६२,००० देशात कोरोनाचे नवे रुग्ण, सहा महिन्यांतील उच्चांकी संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 04:46 IST

coronavirus : दिवसेंदिवस काेराेनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येत सलग १८ व्या दिवशी माेठी वाढ नाेंदविण्यात आली असून, रविवारी ६ महिन्यांतील उच्चांकी रुग्णसंख्या नाेंदविण्यात आली.

नवी दिल्ली : दिवसेंदिवस काेराेनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येत सलग १८ व्या दिवशी माेठी वाढ नाेंदविण्यात आली असून, रविवारी ६ महिन्यांतील उच्चांकी रुग्णसंख्या नाेंदविण्यात आली. तब्बल ६२ हजार ७१४ नवे रुग्ण आढळले असून, ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण काेराेना पाॅझिटिव्हिटीचा सर्वाधिक २२.७८ टक्के दर महाराष्ट्राचा आहे. गेल्या वर्षी ऑक्टाेबरमधील दरराेजच्या रुग्णसंख्येएवढे रुग्ण आढळत असून, केवळ महिनाभरातच वाढ झाली आहे. (New coronavirus cases in 62,000 countries, six-month high)रविवारी ६२ हजार ७१४ नवे रुग्ण नाेंदविण्यात आले, तर ३१२ जणांचा मृत्यू झाला. सलग दुसऱ्या दिवशी ६२ हजारांहून अधिक रुग्णसंख्या नाेंदविण्यात आली आहे. यापूर्वी १६ ऑक्टाेबर २०२० नंतरची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे, तर २५ डिसेंबर २०२० च्या ३३६ मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू नाेंदविण्यात आले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ८६ हजार ३१० झाली आहे. काेराेनातून १ काेटी १३ लाख २३ हजार ७६२ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. वाढलेल्या रुग्णसंख्येचा रुग्ण बरे हाेणाच्या टक्केवारीवर परिणाम झाला असून, हा दर ९४.५८ टक्क्यांपर्यंत आला आहे, तर मृत्युदर १.३५ टक्के झाला आहे. देशभरात एकूण १ लाख ६१ हजार ५५२ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ५४०७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये १२६५९, कर्नाटकमध्ये १२४९२, दिल्लीत १०९९७, पश्चिम बंगालमध्ये १०३२२, उत्तर प्रदेशात ८७८३, आंध्र प्रदेशात ७२०३ आणि पंजाबमध्ये ६६२१ जणांच्या मृत्यूची नाेंद करण्यात आली.  

३१२  जणांचा मृत्यू देशातील ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये काेराेनाचा सर्वाधिक पाॅझिटिव्हिटी दर आहे. या राज्यांमध्ये देशाच्या ५.०४ टक्क्यांहून अधिक दर नाेंदविण्यात आला आहे.  महाराष्ट्रात सर्वाधिक पाॅझिटिव्हिटी दर महाराष्ट्र : २२.७८ टक्केचंदीगड : ११.८५पंजाब : ८.४५गाेवा : ७.०३पुडुचेरी : ६.८५छत्तीसगढ : ६.७९मध्यप्रदेश : ६.६५ हरयाणा : ५.४१ टक्के ८४% गेल्या २४ तासांमधील नव्या रुग्णसंख्येत या राज्यांतील ८४ टक्के रुग्ण आहेत. महाराष्ट्राची आघाडीएकूण लसीकरणात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. राज्यात ५३.९ लाख जणांचे लसीकरण झाले आहे. राजस्थानमध्ये ५३.१ लाख जणांना लस दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र