शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

Good news : डेल्टा+पासून सुरक्षिततेसाठी लशींचे मिश्रन एक ऑप्शन, पण...; AIIMSच्या संचालकांनी सांगितला मोठा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 16:13 IST

Delta plus variant : गेल्या महिन्यात सरकारनेही, आपण लशींच्या मिश्रणाच्या पर्यायावर विचार करत आहोत, असे म्हटले होते. नीती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल यांनी म्हटले होते, की म्यूटेटेड व्हेरिएंटपासून सुरक्षितता आणि व्हॅक्सीन कव्हरेज वाढविण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलू शकतो.

नवी दिल्ली - कोरोनाचा अत्यंत संक्रमक डेल्टा आणि डेल्टा प्लस सारख्या व्हेरिएंटविरोधात लढण्यासाठी लशींचे मिश्रण एक ऑप्शन असू शकतो, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. हा निश्चितपणे एक मार्ग असू शकतो. मात्र, यावर कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला आणखी डेटा एकत्रित करणे आवश्यक आहे, असेही गुलेरीया यांनी म्हटले आहे.

गेल्या महिन्यात सरकारनेही, आपण लशींच्या मिश्रणाच्या पर्यायावर विचार करत आहोत, असे म्हटले होते. नीती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल यांनी म्हटले होते, की म्यूटेटेड व्हेरिएंटपासून सुरक्षितता आणि व्हॅक्सीन कव्हरेज वाढविण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलू शकतो. यावरील परीक्षणाचे परिणाम काही महिन्यांतच येतील, अशी आशा आहे. 

न्यूज वेबसाइट एनडीटीव्ही शी बोलताना डॉ. गुलेरिया म्हणाले, की प्राथमिक अभ्यासानुसार लसींचे मिश्रणदेखील एक पर्याय असू शकतो. परंतु आम्हाला अद्याप आणखी डेटाची आवश्यकता आहे. कोणते मिश्रण चांगले असेल, यावर आणखी संशोधनाची आवश्यकता आहे. पण हो, ही निश्चितपणे एक शक्यता आहे. लशींच्या मिश्रणावर इतर देशांतही प्रयोग सुरू आहेत.

जुलै अखेरपर्यंत भारतात दररोज १ कोटी नागरिकांच्या लसीकरणाचं लक्ष्य : डॉ. रणदीप गुलेरिया

डेल्टासाठी सिंगल डोस पुसेरा नाही - गुलेरियाडॉ. गुलेरिया म्हणाले, डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध कदाचित सिंगल डोस पुरेसा ठरणार नाही. संशोधनातही सांगण्यात आले आहे, की सिंगल डोस केवळ 33 टक्केच संरक्षण देतो. जेव्हा दोन्ही डोस दिले जातात तेव्हा लोकांना 90 टक्के सुरक्षा मिलते. तसेच, डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध कदाचित सिंगल डोस पुरेसा ठरणार नाही, ही आपल्यासाठी चिंतेची गोष्ट आहे. अशात आपल्याला दुसरा डोस देण्याची आवश्यकता आहे. पण तो फार आधीच द्यावा लागेल. जेणे करून सर्वांची सुरक्षितता निश्चित करता येईल, असेही गुलेरिया म्हणाले.

लशीच्या मिश्रणासंदर्भात दोन रिपोर्ट पब्लिश  -पहिला रिपोर्ट - गेल्या महिन्यात द लॅन्सेट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका ब्रिटिश स्टडीनुसार, सर्वप्रथम लोकांना एस्ट्राजेनेका म्हणजेच कोविशिल्डचा डोस देण्यात आला. यानंतर दुसरा डोस फायझरचा देण्यात आला. यात काही वेळापर्यंत याचे साइड इफेक्ट्स दिसून आले होते. मात्र, ते सौम्य स्वरुपाचे होते. याच्या परिणामांचा डेटा मिळणे अद्याप बाकी आहे.

दुसरा रिपोर्ट : यापूर्वी स्पेनमध्ये झालेल्या एका अभ्यासात कोविशिल्ड आणि फायझरच्या डोसचे मिश्रण केल्यानंतर ती सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे समोर आले होते.

ब्लॅक फंगसचा मृत्यूदर कोरोनापेक्षा अधिक, स्पर्श केल्याने पसरतो का? डॉ. गुलेरिया यांनी दिली महत्वाची माहिती

डॉ. गुलेरिया म्हणाले, तिसऱ्या लाटेसंदर्भात बोलले जात आहे, की तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेच्या तुलनेत अधिक घातक ठरेल. पण माला वाटते, की येणारी लाट तेवढी घातक नसेल.  आपल्याला दुसऱ्या लाटेपासून धडा घेत तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAIIMS hospitalएम्स रुग्णालय