शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

CoronaVirus: मशीद रिकामी करण्यास मौलानांचा नकार; मध्यरात्री पोहोचले अजित डोवाल अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 13:55 IST

Corornavirus: पुन्हा एकदा अमित शहांच्या मदतीला धावले अजित डोवाल

नवी दिल्ली: एकीकडे देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आता दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये काही दिवसांपूर्वीच तबलिगी समाजाच्या मरकजचं आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मरकजमध्ये सहभागी झालेले शेकडो लोक देशभरात गेल्यानं अनेक राज्यांची झोप उडाली आहे. मरकजमध्ये सहभागी झालेल्या २४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या ३५० जणांना दिल्लीतल्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मरकजमध्ये सामील झालेल्या अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचं, शेकडो जण त्यांच्या संपर्कात आल्याचं समोर येऊनही मौलानांनी मरकजचं आयोजन करण्यात आलेली मशीद रिकामी करण्यास नकार दिला. त्यांनी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या आदेशांकडेही दुर्लक्ष केलं. अखेर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मध्यरात्री मशीद परिसरात धाव घेतली. गृहमंत्री अमित शहांनी त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली होती. गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोवाल २८-२९ मार्चच्या रात्री दोन वाजता मौलाना साद यांची भेट घेण्यास पोहोचले. मरकजमध्ये असलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याची सूचना डोवाल यांनी केली. याआधी मरकजमध्ये सहभागी होऊन तेलंगणात परतलेल्या नऊ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती पुढे आली होती. यानंतर मरकजनं २८ आणि २९ मार्चला १६९ तबलिगींना रुग्णालयात दाखल होण्यास परवानगी दिली. डोवाल यांनी हस्तक्षेप केल्यानं मशिदीची सफाई करण्यात आली. डोवाल यांनी गेल्या काही दशकांमध्ये देश, परदेशातल्या विविध मुस्लिम संघटनांशी अतिशय जवळचे संबंध प्रस्थापित केले आहेत. ते जवळपास सर्वच मुस्लिम मौलवी, उलेमांना ओळखतात. देशाचं संरक्षण धोरण आखताना डोवाल बराच वेळ त्यांच्या संपर्कातदेखील असतात. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAjit Dovalअजित डोवालAmit Shahअमित शहा