शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
3
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
4
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
5
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
6
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
7
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
8
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
9
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
10
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
11
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
12
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
13
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
14
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
15
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
16
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
17
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
18
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
19
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
20
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास

CoronaVirus News: जूनमध्ये कोरोना हाहाकार माजवणार? आरोग्य मंत्रालयाने दिले 'असे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 20:09 IST

एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले होते, 'सध्याचा ट्रेंड पाहता कोरोनाचे रुग्ण जून महिन्यात आपल्या  सर्वोच्च पातळीवर असतील. मात्र हा आजार झटपट संपून जाईल असे नाही. आपल्याला कोरोनासोबतच राहावे लागेल. हळूहळू कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल.'

ठळक मुद्देमे महिना सुरू झाल्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी झपाट्याने वाढ होऊ लागली आहेमहाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंता अधिक वाढली आहेएम्सचे संचालक रणदीप गुलेरिया एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले होते, कोरोनाचे रुग्ण जून महिन्यात आपल्या  सर्वोच्च पातळीवर असतील

नवी दिल्ली - मे महिना सुरू झाल्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंता अधिक वाढली आहे. यासंदर्भात दिल्ली एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी नुकताच दावा केला, की जूनमध्ये भारतातील कोरोना रुग्णांची संख्येत फार मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. त्यांच्या या दाव्यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तर दिले आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिले असे उत्तर -आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, जर आपण आवश्यक ती सावधगिरी बाळगली आणि दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले, तर कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्यापासून आपण रोखू शकतो. मात्र, आपण आवश्यक ती सावधगिरी बाळगली नाही आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन केले नाही, तर कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू शकते.

आणखी वाचा - CoronaVirus News : 'या' 6 व्हॅक्सीन मानवासाठी ठरू शकतात वरदान, कोरोनाच्या विळख्यातून करू शकतात जगाची सुटका

काय म्हणाले होते रणदीप गुलेरिया -एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले होते, 'सध्याचा ट्रेंड पाहता कोरोनाचे रुग्ण जून महिन्यात आपल्या  सर्वोच्च पातळीवर असतील. मात्र हा आजार झटपट संपून जाईल असे नाही. आपल्याला कोरोनासोबतच राहावे लागेल. हळूहळू कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल.'

'आपल्याला लॉकडाऊनचा निश्चितपणे फायदा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे आपल्या देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेला नाही. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमी प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. रुग्णालयांनी लॉकडाऊनदरम्यान पुरेशी तयारी करून ठेवली आहे. डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच पीपीई किट्स, व्हेंटिलेटर्स आणि वैद्यकीय उपकरणांची सोय करण्यात आली आहे,' असेही गुलेरिया म्हणाले होते.

आणखी वाचा - LockdownNews : इम्रान सरकारचं मोठं पाऊल; लॉकडाउन हटविण्याचा घेतला निर्णय, 'असं' सांगितलं कारण

24 तासांत देशात 3390 नवे रुग्ण -आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,  गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 3390  नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 1273 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 56,342 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1800 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 37,916 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 16,540 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जवळपास 29.36 टक्के लोकांनी कोरोनावर मात केली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, गर्दीच्या ठिकाणीही जाणे टाळा. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना केले आहे. 

आणखी वाचा - CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनानं आतापर्यंत बदललीयेत शेकडो रुपं, वैज्ञानिकांचे हात अद्यापही रिकामेच

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईdelhiदिल्लीGujaratगुजरातGovernmentसरकार