शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोनाचा फटका! लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 21:53 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच दुसरीकडे कोट्यवधींचे रोजगारदेखील धोक्यात आले आहेत.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अमेरिका, इटली, स्पेनसारख्या देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच दुसरीकडे कोट्यवधींचे रोजगारदेखील धोक्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे कित्येकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. अनेकांना रोजगार देणाऱ्या प्रमुख क्षेत्रांना कोरोनाचा थेट फटका बसला आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-धंदे बंद झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले आहेत. याच दरम्यान बेरोजगारीची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशातील बेरोजगारीचा दर हा 27.1 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेने बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये 3 मे रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील बेरोजगारीचा दर 27.1 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा छोटे व्यावसायिक आणि मजुरांना बसला आहे. महिनाभरात 12 कोटींपेक्षा अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. 

CMIE ने दिलेल्या माहितीनुसार, छोटे व्यावसायिक, फेरीवाले, बांधकाम मजूर, हाताने रिक्षा ओढणारे, हमाल अशी दैनंदिन कमाई करणाऱ्या मजुरांचा रोजगार हा लॉकडाऊनमुळे गेला आहे. तसेच नोकरी गमावणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत. तर दुसरीकडे नोकरी शोधणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याआधी आलेल्या सर्व्हे रिपोर्टनुसार, एप्रिल 2020 मध्ये देशातील बेरोजगारीचे प्रमाण 23.5 टक्क्यांवर पोहोचले. फक्त एप्रिलमध्येच बेरोजगारीचा दर 14.8 टक्क्यांनी वाढला होता. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

संपूर्ण जगात थैमान घालत असलेल्या कोरोनाचा फैलाव देशातही वेगाने होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश उद्योगधंदे बंद असून, त्याचा विपरीत परिणाम रोजगारनिर्मितीवर झाला आहे. रोजगार आणि रोजंदारीवर विपरीत परिणाम झाला आहे. लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. त्याचं अर्थव्यवस्थेतलं योगदान मोठं आहे. लॉकडाऊनचा मोठा फटका या उद्योगांना बसला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

CoronaVirus News : लग्नासाठी 50 तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी, जाणून घ्या गृहमंत्रालयाचे 'हे' नियम 

CoronaVirus News : Hydroxychloroquine की Remdesivir... कोरोनावर कोणतं औषध प्रभावी?, तज्ज्ञ म्हणतात...

CoronaVirus News : महाराष्ट्रातील 'या' शहरात सगळी दुकानं उघडणार, लग्नसोहळेही होणार... अर्थात अटी-शर्ती लागू

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 2,52,675 जणांचा मृत्यू; अमेरिकेत परिस्थिती गंभीर

CoronaVirus News : "...हे तर आमच्याकडून देशासाठी केलेलं दान", मद्यप्रेमीचा 'हा' Video व्हायरल

CoronaVirus News : खोकल्याचं औषध घेत असाल तर वेळीच व्हा सावध, वाढू शकतो कोरोनाचा धोका?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतjobनोकरीUnemploymentबेरोजगारी