शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: तिकीट भाडं वसूल करून पैसे आम्हाला द्या; 'ते' पत्र समोर आल्यानं रेल्वेची गोची

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 15:41 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: दोन दिवसांपूर्वीच रेल्वे प्रशासनाचं पत्र समोर

मुंबई: लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये सोडण्यासाठी रेल्वेनं श्रमिक विशेष गाड्या सोडल्या आहेत. मात्र रेल्वेनं या तिकिटांचे पैसे मजुरांकडून घेतल्याचा दावा करत विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. यानंतर रेल्वेनं आपण केवळ वाहतूक खर्चाच्या १५ टक्के रक्कम राज्य सरकारांकडून घेत असल्याचं स्पष्टीकरण दिलं. प्रवासी मजुरांना कोणतीही तिकीटं विकली जात नसल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं. मात्र रेल्वेचं एक पत्र समोर आलं आहे. त्यामुळे मजुरांच्या तिकीट भाड्याबद्दलच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्याचं दिसत आहे. 'आज तक'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.मजुरांच्या तिकीट खर्चावरुन राजकीय वाद निर्माण झाला असताना रेल्वेचं एक पत्र समोर आलं आहे. राज्य सरकारांनी मजुरांना रेल्वेची तिकीटं हस्तांतरित करावीत आणि तिकीट भाडं गोळा करून ते रेल्वेकडे जमा करावं, अशी सूचना रेल्वेच्या पत्रात आहे. या पत्रावर २ मे ही तारीख आहे. देशभरात अडकलेले प्रवासी मजूर, भाविक, पर्यटक, विद्यार्थ्यांसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार असल्याचा उल्लेखदेखील या पत्रात आहे.

ज्या राज्यांमध्ये विशेष ट्रेन सोडल्या जाणार आहेत, त्या राज्यांनी मजुरांची यादी रेल्वेला द्यावी. त्याप्रमाणे रेल्वेकडून तिकीटं छापली जातील. त्यानंतर राज्य सरकारांना रेल्वेकडून तिकीटं दिली जातील. राज्य सरकारांनी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तिकीटं मजुरांना द्यावीत आणि त्यांच्याकडून आलेलं तिकीट भाडं रेल्वेकडे जमा करावं, असा मजकूर रेल्वेच्या पत्रात आहे.

रेल्वेनं काय दावा केला होता?रेल्वेकडून प्रवासी मजुरांना कोणतीही तिकीटं विकली जात नाहीयेत, असा रेल्वेचा दावा होता. रेल्वे राज्य सरकारांकडून केवळ खर्चाच्या १५ टक्के रक्कम आकारत आहे. 'मजुरांच्या वाहतुकीसाठी येणाऱ्या खर्चापैकी केवळ १५ टक्के रक्कम रेल्वे प्रशासन राज्य सरकारांकडून घेत आहे. रेल्वे मजुरांना कोणतीही तिकीटं विकत नाही. राज्य सरकारांकडून मिळणाऱ्या यादीनुसार श्रमिक रेल्वेत मजुरांना प्रवेश दिला जातो,' असं रेल्वेनं म्हटलं होतं.घरी परतणाऱ्या मजुरांचा खर्च उचलणार काँग्रेस, सोनिया गांधींची मोठी घोषणागरीब मजूरांकडून तिकीटाचे पैसे घेऊ नका, मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारला विनंती... तर लॉकडाऊनचे नियम मोडून रस्त्यावर उतरु, खासदार जलील यांचा इशारा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वे