शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
4
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
5
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
6
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
7
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
8
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
9
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
10
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
11
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
12
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
13
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
14
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
15
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
16
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
17
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
18
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
19
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
20
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला

CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनातून बरी होऊन डॉक्टर घरी आली; शेजाऱ्यांनी केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 3:35 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: घरापासून दूर राहून ते कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 47 लाखांवर पोहोचली आहे. कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. घरापासून दूर राहून ते कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनातून बरी होऊन परतलेल्या डॉक्टरला शेजाऱ्यांनी कुलूप घालून बंद केल्याची घटना घडली आहे. 

दिल्लीतील वसंतकुंज परिसरात राहणाऱ्या एका महिला डॉक्टरला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारानंतर त्या बऱ्या होऊन आपल्या घरी परतल्या होत्या. मात्र घरी आल्यावर त्यांच्याशी शेजाऱ्यांनी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली. शेजाऱ्यांनी डॉक्टरला घरात कुलूप लावून डांबून ठेवलं तसेच सोसायटी सोडण्यासाठी धमकीही देण्यात आली. महिला डॉक्टरने याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. सायंकाळी साडेचारच्या सुमारास शेजाऱ्यांनी अचानक आरडाओरड सुरू केला आणि मला शिव्याही दिल्या असं डॉक्टरने तक्रारीत म्हटलं आहे. 

तुम्हाला कोरोना झाला आहे त्यामुळे तुम्ही आता येथे राहू शकत नाही असं शेजाऱ्यांनी महिला डॉक्टरला सांगितलं. त्यावर डॉक्टरने मी क्वारंटाइन पूर्ण करून आणि रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरी राहण्यासाठी आले असल्याचं सांगितलं. मात्र तरीही शेजाऱ्यांनी आरडाओरडा बंद केला नाही. बघतोच तू बाहेर कशी निघतेस असं म्हणत घराला बाहेरून कुलुपही लावलं अशी माहिती डॉक्टरने पोलिसांना दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : मस्तच! कोरोनाच्या संकटात 'हा' हटके रिस्टबँड फायदेशीर ठरणार; वेळोवेळी सतर्क करणार

Atmanirbhar Bharat Abhiyan : शिक्षण हायटेक होणार; प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल येणार

CoronaVirus News : आशेचा किरण! जगभरात आठ लसींची वैद्यकीय चाचणी सुरू; WHOची दिलासादायक माहिती

CoronaVirus News : बापमाणूस! रणरणत्या उन्हात चिमुकल्यांसाठी तो झाला 'श्रावणबाळ'

CoronaVirus News : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90 हजारांवर; 'या' 5 शहरांतील स्थिती गंभीर

फक्त एक कप चहाने अनेकांचं आयुष्य वाचवलं; जाणून घ्या 'त्या' दिवशी नेमकं काय झालं?

चीनच्या कंपन्यांना खेचण्यासाठी भारताचा 'डाव'; 'या' 9 राज्यांत देणार वाव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीdoctorडॉक्टरPoliceपोलिस