शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

CoronaVirus News : "...तर कोरोनाऐवजी लॉकडाऊनमुळे जास्त लोकांचा मृत्यू होईल"             

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 13:34 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 33 हजारांवर गेला आहे तर 1000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मुर्ती यांनी लॉकडाऊनवर चिंता व्यक्त केली आहे. 

नवी दिल्ली - भारतासह अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 33 हजारांवर गेला आहे तर 1000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मुर्ती यांनी लॉकडाऊनवर चिंता व्यक्त केली आहे. 

लॉकडाऊन पुढेही सुरू राहिल्यास कोरोनामुळे नाही तर उपासमारीमुळे भारतात जास्त लोकांचा मृत्यू होईल अशी भीती नारायण मुर्ती यांनी व्यक्त केली आहे. 'कोरोनाला आता आपण स्वीकारायला हवं आणि लोकांना कामावर येण्यास परवानगी द्यायला हवी. मात्र त्याचवेळी याचा संसर्ग होण्याची सर्वाधिक शक्यता असणाऱ्यांची काळजी घ्यायला हवी. एका मर्यादेनंतर कोरोना व्हायरसपेक्षा उपासमारीमुळे होणारे मृत्यू हे अधिक असतील. त्यामुळे भारत लॉकडाऊनचा कालावधी अधिक काळ सुरू ठेवू शकत नाही हे समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे' असं मत त्यांनी मांडलं आहे.

नारायण मुर्ती यांनी 'कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येकडे पाहिलं तर भारतातील मृत्यूदर हा 0.25 ते 0.5 टक्क्यांच्या दरम्यान आहे. इतर विकसनशील देशांच्या तुलनेत हा मृत्यूदर कमी फार कमी आहे. भारतात विविध कारणांमुळे दरवर्षी 9 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. भारत हा जगातील सर्वात जास्त प्रदूषण असलेल्या देशांपैकी एक आहे. दरवर्षी होणाऱ्या मृत्यूपैकी एक चतुर्थांश मृत्यू हे प्रदुषणामुळे होत असतात. गेल्या दोन महिन्यांत 1 हजार जणांचा मृत्यू झाला आहे आणि जर दरवर्षी 9 दशलक्ष लोकांचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या होत असेल तर ही घाबरण्यासारखी स्थिती आहे असं म्हणता येणार नाही' असं म्हटलं आहे.

'भारतात तब्बल 190 दशलक्ष लोक असंघटीत क्षेत्रात काम करत आहेत किंवा त्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. लॉकडाऊनमुळे यापैकी काहींनी आपलं काम गमावलं आहे. यापुढेही लॉकडाऊन मोठ्या कालावधीसाठी सुरू राहिला तर आणखी लोकांना आपलं काम गमवावं लागेल' अशी भीतीही नारायण मुर्ती यांनी व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 218,187 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 3,147,623 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 961,871 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Rishi Kapoor passed away : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न

Rishi Kapoor passed away: ऋषी कपूर म्हणजे गुणवत्तेचा खजिना; पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInfosysइन्फोसिसIndiaभारतDeathमृत्यू