शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: गोव्यानंतर देशातील 'हे' राज्यही कोरोना मुक्त, ठणठणीत होऊन घरी परतला एकमेव रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 22:40 IST

एक 50 वर्षीय ख्रिश्चन धर्मगुरू (पाद्री) नेदरलँडला गेले होते. 24 मार्चला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

ठळक मुद्देसंक्रमित ख्रिश्चन धर्मगुरूला (पाद्री) डिस्चार्जगेल्या 24 तासांच्या कालावधीत कोरोना झालेल्या संबंधित धर्मगुरूचे सर्व चारही नमूने निगेटिव्ह आले आहेत. गोव्याने गेल्या महिन्यातच केला आहे कोरोनाचा पराभव -

इंफाळ : सध्या संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. असे असतानाच, गोव्यानंतर आता देशातील आणखी एक राज्य कोरोनामुक्त झाले आहे. या राज्याचे नाव आहे, मिझोरम, येथे केवळ एकच कोरोनाबाधित व्यक्ती होती. तीही आता ठणठणीत होऊन घरी परतली आहे. संक्रमित ख्रिश्चन धर्मगुरूला (पाद्री) डिस्चार्ज -देशातील इशान्येकडील राज्य असलेल्या मिझोरमधील एक 50 वर्षीय ख्रिश्चन धर्मगुरू (पाद्री) नेदरलँडला गेले होते. 24 मार्चला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. मिझोरमचे आरोग्यमंत्री आर ललथंगलिआना यांनी सांगितले, की गेल्या 24 तासांच्या कालावधीत कोरोना झालेल्या संबंधित धर्मगुरूचे सर्व चारही नमूने निगेटिव्ह आले आहेत. त्यांना शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

आणखी वाचा - CoronaVirus, LockdownNews: 17 मेनंतरही लॉकडाउन वाढणार का?; डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिलं 'असं' उत्तर

आता मिझोरममध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही -आरोग्यमंत्री म्हणाले,'मिझोरम हे कोरोनामुक्त राज्य म्हणून घोषित केले जाऊ शकते. कारण आमच्याकडे कोरोनाचा आता एकही रुग्ण नाही.' तनावाच्या परिस्थितीत आलेल्या या सकारात्मक बातमीने कोरोना वॉरियर्सचे मनोबल वाढवले आहे.

गोव्याने गेल्या महिन्यातच केला आहे कोरोनाचा पराभव -यापूर्वी गेल्या महिन्यातच गोवा राज्यानेही कोरोनावर मात केली आहे. येथे  एकूण 7 कोरोनाबाधित होते. यातील शेवटचे सॅम्पलही निगेटिव्ह आले आहे. आता गोव्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही.

आणखी वाचा - CoronaVirus News: दिलासादायक; "फ्लॅट नव्हे, लवकरच रिव्हर्स येईल 'कोरोना ग्राफ', आता 'स्वदेशी' टेस्टिंग किट्सने होणार तपासणी"

कोरोना आता भारतात वेगाने पसरू लागला आहे. आतापर्यंत देशात 59,662 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यापैकी 1,981 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 17,847 जण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.

आणखी वाचा - 40 कुटुंबांचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश; पूर्वजांना औरंगजेबाने मुस्लीम बनवल्याचा दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवाmizoram-pcमिजोरमIndiaभारतhospitalहॉस्पिटल