शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

CoronaVirus : ममतांना निवडणुकीची भीती; कोरोनावर बदलली रणनीती, थेट 'यां'च्याशी साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 00:41 IST

तृणमूल काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनतेतील वाढता असंतोष, कमी परीक्षण तसेच केंद्राच्या चमूंनी दिलेल्या तिखट प्रतिक्रियांसारख्या अनेक कारणांमुळे, ममतांनी आपली रणनीती बदली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलला याचा मोठा फटका बसू शकतो.

ठळक मुद्देममता सरकारवर कोरोना व्हायरससंदर्भातील धोरणावरून सातत्याने टीका होत आहेपुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलला मोठा फटका बसू शकतोसध्याच्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये 1344 रुग्ण समोर आले आहेत

कोलकाता : ममता सरकारवर कोरोना व्हायरससंदर्भातील धोरणावरून सातत्याने टीका होत आहे. यामुळे आता पश्चिम बंगालमधील ममता सरकारने, कोरोना परीक्षणात मोठ्या प्रमाणावर वाढ करत, कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंसंदर्भात ऑडिट समितीच्या क्षेत्राधिकारातही बदल करत आणि लॉकडाउन कठोर करत, आपली रणनीती बदलली आहे. एवढेच नाही, तर ममता सरकारने यासंदर्भात निवडणूक डावपेचातील रथी प्रशांत किशोर यांच्याशीही संपर्क साधला आहे.

तृणमूल काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनतेतील वाढता असंतोष, कमी परीक्षण तसेच केंद्राच्या चमूंनी दिलेल्या तिखट प्रतिक्रियांसारख्या अनेक कारणांमुळे, ममतांनी आपली रणनीती बदली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलला याचा मोठा फटका बसू शकतो.

राज्यात कोरोनाचे 1344  रुग्ण -तृणमूलच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, 'जिल्ह्यामधून येणारे अहवाल चिंताजन होते. कारण या संकटाच्या काळात राज्य सरकारच्या व्यवस्थापनाप्रती जनता संतप्त होती. केंद्रावर केली जाणारी टीकाही जनतेच्या गळ्याखाली उतरली नाही आणि कोरोनाच्या स्थितीवरून सातत्याने प्रश्न उपस्थित केले गेले.' सध्याच्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये 1344 रुग्ण समोर आले आहेत. 140 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, यापैकी 68 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे म्हणण्यात आले आहे. तर इतरांना इतर आजारही होते.

प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क -तृणमूलच्या आणखी एका नेत्याने म्हटले आहे, की ‘2021च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच, कोरोनाच्या मुद्द्यावरून ममता सरकारवर आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांनी आता निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. यानंतर एक बहुआयामी रणनीती तयार करण्यात आली आहे. जी लागू करण्यासाठी प्रशासकीय तथा राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असते. त्यांच्या मार्गदर्शनातच पक्ष सशक्त असल्याचे दाखवत आहे, चुकाही सुधारत आहे. तसेच  भाजपशीही दोन हात करत आहे.'

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल