शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

coronavirus: एका व्यक्तीने चक्क एटीएममधून चोरलं सॅनिटायझर, व्हिडीओ पाहून आयपीएस अधिकारी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 17:23 IST

coronavirus in India : कोरोनापासून बचावासाठी हॉटेल, रेस्टॉरंट्स, विविध कार्यालये आणि एटीएममध्येही कोरोनापासून बचावासाठी आता सॅनिटायझरच्या बाटल्या ठेवल्या जात आहेत. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

ठळक मुद्देही घटना केरळमधील कोझिकोडे येथील असल्याचे सांगण्यात येत आहे येथील एका एटीएममध्ये एक व्यक्ती पैसे काढण्यासाठी आली होतीएटीएममधून पैसे काढल्यानंतर या व्यक्तीने हात सॅनिटाइझ करण्यासाठी ठेवलेली सॅनिटायझरची बाटलीही उचलून नेली

नवी दिल्ली - देशात कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून हँड सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पूर्वी अगदी मोजक्या लोकांकडेच दिसणाऱ्या सॅनिटायझरच्या बाटल्या ह्या आता सर्रास सगळ्यांकडे दिसू लागल्या आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट्स, विविध कार्यालये आणि एटीएममध्येही कोरोनापासून बचावासाठी आता सॅनिटायझरच्या बाटल्या ठेवल्या जात आहेत. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एटीएममधून चक्क सॅनिटायझरची बाटली चोरून नेताना दिसत आहे. ही घटना केरळमधील कोझिकोडे येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.  (A man stole sanitizer from an ATM, IPS officer said, 'hum nhi sudhrenge' after watching the video )

येथील एका एटीएममध्ये एक व्यक्ती पैसे काढण्यासाठी आली होती. एटीएममधून पैसे काढल्यानंतर या व्यक्तीने हात सॅनिटाइझ करण्यासाठी ठेवलेली सॅनिटायझरची बाटलीही उचलून नेली. दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपीएस अधिकारी दीपांशू काब्रा यांनी तो व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते म्हणतात की, देशामध्या लाखो एटीएम आहेत. अशा मूर्खांपासून एटीएममधील सॅनिटायझर वाचवण्यासाठी प्रत्येक एटीएममध्ये २०० ते ३०० रुपयांचा पिंजरा लावावा लागला तर शेकडो कोटी रुपये खर्च होतील. तुमच्या मर्यादित आचरणामुळे हे पैसे वाचले असते. तसेच तुमच्याच भल्यासाठी खर्च झाले असते. असो, आम्ही सुधरणार नाही. 

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एटीएममध्ये आलेली व्यक्ती प्रथम तिथे असलेल्या हॅंड सॅनिटायझरने हात स्वच्छ केले. त्यानंतर एटीएम कार्ड काढून एटीएममधून पैसे काढले. त्यानंतर पुन्हा सॅनिटायझरच्या बाटलीकडे आणि सीसीटीव्हीकडे पाहिले. त्यानंतर त्याने ही सॅनिटायझरची बाटली उचलून बॅगेत टाकली आणि निघून गेला.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीKeralaकेरळatmएटीएमSocial Viralसोशल व्हायरल