शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: पेट्रोल पंपवर एक जण खोकल्यानं खळबळ; प्रकरण वाढल्यानं पोलिसांना बोलावण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 18:16 IST

दुचाकीस्वाराला कोरोना झाल्याचा संशय; पेट्रोल पंप कर्मचाऱ्याचा पेट्रोल भरण्यास नकार

कानपूर: कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्यानं वाढत असल्यानं प्रत्येक जण सतर्क झाला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शक्य तितकी काळजी घेतली जात आहे. साधा ताप किंवा खोकला आल्यानंतरही व्यक्तीकडे संशयानं पाहिलं जाऊ लागलं आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरच्या बर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पेट्रोल पंपवर याचीच प्रचिती आली. दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला खोकला आला. त्यानंतर पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यानं दुचाकीत पेट्रोल टाकण्यास नकार दिला. दुचाकीस्वाराला आलेला खोकला, त्यामुळे कर्मचाऱ्यानं पेट्रोल पंप कर्मचाऱ्यानं पेट्रोल भरण्यास दिलेला नकार यावरून वाद निर्माण झाला. वाद विकोपाला गेल्यानं व्यवस्थापकानं ११२ क्रमांकावरुन संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून भांडणाऱ्या दोघांना शांत केलं. पोलिसांनी बाटलीत पेट्रोल भरून संबंधित दुचाकीस्वाराला घरी जाऊन आराम करण्याची सूचना केली. गुजैनी भागात राहणारा दुचाकीस्वार बर्रा बायपासजवळील पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यास गेला होता, अशी माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक रंजीत राय यांनी दिली. दुचाकी उभी करताना त्याला खोकला येऊ लागला. त्याला उभं राहतानाही त्रास होत होता. त्यामुळे संबंधित व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असावी असा संशय व्यवस्थापक विनोद यांना आला. त्यामुळे त्यांनी दुचाकीत पेट्रोल भरण्यास नकार दिला, असं राय यांनी सांगितलं.दुचाकीस्वार आणि पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांवरील वादाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांनाही शांत केलं. पेट्रोल पंपवर उपस्थित असलेल्या व्यवस्थापकानं दुचाकीस्वाराची थर्मल टेस्ट केली. त्याच्या शरीराचं तापमान नॉर्मल होतं. पोलिसांनी दुचाकीस्वाराला घरी जाण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वाराच्या फोटोसह त्याची माहितीदेखील घेऊन ठेवली आहे."येत्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढणार; पण..."...अन् आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधिताचा मृतदेह खड्ड्यात फेकला; व्हिडीओ व्हायरलरुग्णालयानं कोरोना चाचणी अहवाल येण्याआधीच मृतदेह ताब्यात दिला, 500 जणांच्या उपस्थितीत अंत्यविधी झाला अन्..."कोरोना संकट काळात मोदींसारखं नेतृत्त्व लाभणं हे देशाचं भाग्य"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPetrol Pumpपेट्रोल पंप