शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : पुढच्या महिन्यापासून योगी सरकार देणार गहू आणि तांदळाबरोबरच डाळ मोफत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 21:09 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या परिणामामुळे लॉकडाऊनमध्ये गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी मोफत रेशन देण्यास सुरुवात केली आहे.

लखनऊः  मे महिन्यापासून रेशनकार्ड धारकांना डाळीसह गहू व तांदूळ मोफत देण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारनं घेतला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्रति रेशनकार्ड एक किलो डाळ देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या परिणामामुळे लॉकडाऊनमध्ये गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी मोफत रेशन देण्यास सुरुवात केली आहे.उत्तर प्रदेशचे योगी सरकारही या योजनेंतर्गत 15 एप्रिलपासून पाच किलो तांदूळ मोफत वाटत आहे. आता या महिन्यापासून डाळही देण्यात येणार आहेत, परंतु डाळींचे वेळेत वाटप न झाल्याने ती पुढील महिन्यात मिळणार आहे. मेमध्ये एप्रिलची डाळदेखील ग्राहकांना दिली जाणार आहे. म्हणजेच मे महिन्यात प्रत्येक शिधापत्रिकाधारकास दोन किलो डाळ मोफत देण्यात येणार आहे.बहुतेक जिल्ह्यांमध्ये चण्याची डाळ वाटण्याची तयारी सुरू आहे. सहारनपूर विभागातील अनेक ठिकाणी उडदासह अन्य डाळी पुरवल्या जातील. अन्न विभागाचे प्रधान सचिव देवेश चतुर्वेदी म्हणाले की, पुढील महिन्यात सर्व शिधापत्रिकाधारकांना डाळी मोफत दिल्या जाणार आहेत. याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील महिन्यात एप्रिलची डाळही सर्व शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे.31 लाख कुटुंबातील 1.25 कोटी सदस्यांना तांदळाचं वाटपप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत खाद्य आणि पुरवठा विभागाने रविवारपर्यंत उत्तर प्रदेशातील 31 लाख लाभार्थी कुटुंबातील 1.25 कोटी सदस्यांना 62695 मेट्रिक टन विनामूल्य तांदूळ वाटप केले. 15 एप्रिलपासून या योजनेंतर्गत 2.8 कोटी कार्डधारकांच्या कुटुंबातील 11.78 कोटी सदस्यांना 5.89 लाख मेट्रिक टन तांदूळ मोफत वाटण्यात आले.  हे एकूण वितरण उद्देशाच्या 83 टक्के आहे. त्याचबरोबर कोरोना संक्रमणाच्या प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन 2.29 लाख नवीन शिधापत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. जेणेकरून मजूर आणि गरजू लोकांना रेशन मिळू शकेल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ