शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

Coronavirus: लॉकडाऊनदरम्यान पलायन करणारे ९० टक्के दलित; सरकारकडून दुजाभाव- मायावती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 12:43 IST

देशातील अनेक भागातील लोक पलायन करत आहेत. पलायन करणाऱ्यांमध्ये ९० टक्के लोक हे दलित आणि अतिमागास प्रवर्गातील आहेत, याचा उल्लेखही मायावतींनी केला आहे. 

लखनऊः देशभरात लागू असलेला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याचा मोदी सरकारनं निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल झाले होते. त्याच पार्श्वभूमी बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला आहे. लॉकडाऊनदरम्यान देशभरात दलित आणि मागास वर्गातील लोकांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळेच देशातील अनेक भागातील लोक पलायन करत आहेत. पलायन करणाऱ्यांमध्ये ९० टक्के लोक हे दलित आणि अतिमागास प्रवर्गातील आहेत, याचा उल्लेखही मायावतींनी केला आहे.  डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या १२९व्या जयंतीनिमित्त मायावतींनी उत्तर प्रदेशच्या जनतेला संबोधित केलं. राज्य सरकारांकडून दलित आणि गरिबांची उपेक्षा करण्यात आली आहे. सरकारांनी त्यांच्यासाठी कोणतीही वेगळी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे ते लोक आपापल्या घराकडे पलायन करत आहेत. कोरोनामुळे दलित आणि गरिबांची परिस्थिती हलाखीची झालेली असून, त्याकडे केंद्र सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. आजसुद्धा बदलली नाही जातीयवादाची मानसिकताआजसुद्धा जातीयवादाची मानसिकता पूर्णतः बदललेली नाही. कोरोना व्हायरसची महामारी आपल्या देशात पसरल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर दिल्ली शहर, मध्य प्रदेश, राजस्थान अन्य राज्यांत पोटापाण्यासाठी गेलेले रोजंदारी करणारे मजूर लोक आपापले मालक आणि राज्यांच्या सरकारकडून झालेल्या उपेक्षेनं हवालदिल झालेले आहेत. त्यामुळेच ते आपापल्या घरांकडे पलायन करू लागले आहेत. त्या मजुरांमध्ये दलित, आदिवासी आणि अतिमागास वर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ते आपल्या घराकडे जात असताना राज्य सरकारांनी त्यांच्या जातीकडे पाहून त्यांना सीमेपर्यंतच सोडलं. एवढ्या वाईट परिस्थितीतही राज्य सरकारांनी त्यांना थांबवलं नाही. तसेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा विचारसुद्धा तिथल्या सरकारांनी केलेला नाही. त्यामुळे या मजुरांना अडचणींचा सामना करावा लागला आहे.डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी भारतीय संविधानात दलित आणि मागासांना विशेषाधिकार बहाल केलेले होते. जेणेकरून त्यांचं आयुष्य जगण्याचा दृष्टिकोन बदलून ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. या वर्गासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून मास्टर प्लॉन तयार करण्याची गरज होती. पण तसे काहीही झालेले नाही.  आम आदमी पार्टीवर साधला निशाणाया वर्गांचं सरकार सत्तेत असतं तर परिस्थिती आज वेगळी असती. दिल्लीच्या निवडणुकीतही आपनं या वर्गाला आमिषं दाखवून  त्यांच्याकडून मतं मिळवली आणि त्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडलं. पलायन करत असताना त्यांना थांबवलं नाही, तर सीमेपर्यंत नेऊन सोडल्याचंही मायावती म्हणाल्या आहेत. 

टॅग्स :mayawatiमायावतीcorona virusकोरोना वायरस बातम्या