शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Coronavirus : भीषण वास्तव! लॉकडाऊनमुळे गमावली नोकरी, पदवीधर असूनही तरुणांना करावी लागतेय मजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 22:05 IST

Coronavirus : लॉकडाऊनमुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे बेरोजगारीही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

बुलंदशहर: कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत चालल्यानं देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील उद्योगधंदे ठप्प आहेत. सर्वच कामकाज बंद असल्यानं कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा कुठून, असा प्रश्न कंपन्यांना सतावतो आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. उत्तर प्रदेशही अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे बेरोजगारीही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  लॉकडाऊनमुळे लाखो रुपये खर्च करून बीबीए ते एमए अन् बीएडपर्यंत पदवी घेतलेल्या तरुणांनाही मनरेगामध्ये काम करावं लागतंय. बुलंदशहरच्या जुनेदपूर गावात मनरेगाचे काम सध्या जोरात सुरू आहे. हे काम अशिक्षित असलेल्या कामगारांसाठी आहे, परंतु लॉकडाऊननंतर सतेंद्र कुमार, सुरजित आणि रोशन कुमार हे पदवीधरही नोकरी नसल्यानं या ठिकाणीही मजुरी करत आहेत.सतेंद्र कुमारने सवा लाख खर्च करून बीबीए पदवी मिळविली, तर सुरजित सिंगने शिष्यवृत्तीद्वारे बीएड अभ्यासक्रम पूर्ण केला आणि रोशन कुमार यांनी एमए केले. तसेच वॉशिंग पावडर कंपनीत नोकरीही केली, पण लॉकडाऊनने आता या तिघांना मनरेगाचं काम करण्यास भाग पाडलं आहे. नोकरी गमावल्यानं २०० रुपयांच्या मजुरीवर ते माती उपसण्याचं काम करत आहेत. सतेंद्र कुमार म्हणाला की, माझ्याकडे बीबीए पदवी आहे, पण तरीही मला चांगली नोकरी मिळाली नाही. जिथे मिळाली तिथे फक्त सहा ते सात हजार पगार देत होते. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर ती नोकरीही गमावली. जेव्हा तो इथे आला तेव्हा गावच्या प्रमुखानं मनरेगाच्या कामाला लावले.सुरजित कुमार म्हणाला की, माझ्याकडे एमए, बीएड पदवी आहे. मी नुकताच माझा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. नोकरी मिळण्यापूर्वीच लॉकडाऊन सुरू झालं आणि मग इथे मनरेगाच्या कामात मग्न झालो. रोशनकुमार म्हणाला की मी दोन घनफूट माती उपसण्याचं काम करतो. मला त्यासाठी दोनशे रुपये रोज मिळतो. मी एमए आहे, आधी काम करायचो, चांगले पैसे कमवायचो, लॉकडाऊन सुरू झालं आणि पोटापाण्यासाठी हे काम करावं लागलं. बुलंदशहरच्या जुनैदपूर गावात लॉकडाऊनपूर्वी 20 मजूर काम करायचे, आता ती संख्या 100 कामगारांवर गेली आहे. गाव प्रमुखांच्या मते, या मजुरांमध्ये 20हून अधिक लोक पदवीधारक आहेत. गाव प्रमुख वीरेंद्र सिंह म्हणाले की, ही मुले योग्य बोलत आहेत. लॉकडाऊननंतर त्यांची नोकरी गेली. जर त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं त्यांना मजुरी करावी लागते आहे. सध्या देशभरात 14 कोटी लोकांची जॉब कार्ड बनविली गेली आहेत. या सर्वांना 100 दिवसांची कामे देण्यासाठी 2.8 लाख कोटींची गरज आहे. लॉकडाऊननंतर अनेक लोक बेरोजगार झाले असून, पोटाची  खळगी भरण्यासाठी शिक्षित तरुणांनाही मजुरी करावी लागत असल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे.

हेही वाचा

पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार

...तर भारताला मर्यादित युद्ध लढावेच लागेल, राहुल गांधींनी शेअर केला 'पनाग'चा लेख 

Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये तातडीची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

घरकाम करणाऱ्या महिलेमुळे २० जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह; 750 लोक झाले क्वारंटाइन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'या' पावलांनंतर चीन बिथरला; भारताला दिला इशारा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या