शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus, Lockdown News: दिल्ली मेट्रोची दीड महिन्यात १२०० कोचची देखभाल; कधीही धावण्यास सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 22:58 IST

दिल्ली मेट्रो : लॉकडाऊनमध्ये केल्या तीन हजारावर फेऱ्या

नवी दिल्ली : लॉकडाऊनमध्ये डीएमआरसी प्रशासनाने मेट्रो कोच तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज केले आहेत. एसी सर्व्हिसिंगपासून ते दिव्यांची दुरूस्ती, फ्लोअरची स्वच्छता या काळात करण्यात आली. तब्बल १२०० कोचच्या स्वच्छतेसाठी एचवीएसी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.शक्यतो दिवसभराच्या फेºया संपल्यानंतर मेट्रो कोचची स्वच्छता केली जाते. अत्याधुनिक बनावटीमुळे कोचची स्वच्छता, देखभाल सोपे झाले आहे. डीएमआरसी प्रशासनाने कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाची मार्गदर्शिकाही तयार केली आहे. लॉकडाऊन संपल्यावर मेट्रो वाहतुकीस परवानगी मिळाली तरी सर्व मार्गावर एकाच वेळी मेट्रो सुरू होणार नाही. टप्प्याटप्प्याने कमी गर्दीच्या मेट्रो स्थानकांमध्ये मेट्रो धावेल. मात्र त्यासाठी कोणताही दिवस अद्याप निश्चित नाही जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी रेल्वेच्या जोडीला मेट्रोदेखील धावली.कधीही धावण्यास सज्जमेट्रो रेल्वे दीड महिन्यांच्या काळात ३५०० वेळा रूळावर धावली जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक, औषधे, आरोग्य उपकरणांना दिल्लीत नेण्यात आले. विशेष म्हणजे मेट्रोचे रौप्यमहोत्सवी वर्ष यंदा संपले. या २५ वर्षांच्या काळात मेट्रोने दिल्लीकरांची सेवा केली. मेट्रोत सदैव एसी सुरू असतो. त्यामुळे तेथे कोणत्याही संसर्गजन्य आजाराच्या प्रसाराचा सर्वाधिक धोका असतो. त्यासाठी व्हेंटिलेशन, एसीची दुरूस्ती व स्वच्छता नियमित राखावी लागते. औषध फवारणीदेखील आता केली जाईल. त्यासाठी विशेष रसायन खरेदी करण्यात आले आहे. रसायन फवारणी करून कोचेसची निगा राखली जाते. या १२०० कोच कधीही धावण्यासाठी आता सज्ज आहेत. 

टॅग्स :delhiदिल्लीMetroमेट्रोcorona virusकोरोना वायरस बातम्या