शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ३ मेनंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, पंतप्रधानांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 06:03 IST

मुख्यमंत्र्यांची मते त्यांनी जाणून घेतली. जनजीवन सुरळीत करण्यासाठी ठोस धोरण आखावे लागेल, त्यासाठी उपाच सुचवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे होणारे आर्थिक नुकसान किती काळ सहन करावे, कोरोनाचा मुकाबला करताना नव्या ठिकाणी संसर्ग पसरू नये यासाठी काय करावे, असा असंख्य मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. कोरोना रुग्णांची वाढ होण्यात दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, पंजाब व मध्य प्रदेश आघाडीवर आहेत. त्यामुळे इथे ३ मेनंतरही लॉकडाउन कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यात फिजिकल डिस्टसिंगचा नियम करून जनजीवन सुरळीत करण्यावर भर दिला. तोच कित्ता ३ मे नंतरही गिरवला जाण्याची दाट शक्यता आहे.व्हिडीओ कॅन्फरसिंगद्वारे पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी सोमवारी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांची मते त्यांनी जाणून घेतली. जनजीवन सुरळीत करण्यासाठी ठोस धोरण आखावे लागेल, त्यासाठी उपाच सुचवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.>सहकार्यामुळे प्रसार रोखू शकलोइतर देशांमध्ये ७-८ आठवड्यात भारतापेक्षा १०० पट रूग्ण वाढले. वेळेत लॉकडाऊन केले व राज्यांनी सहकार्य केल्याने आपण कोरोनाला रोखू शकलो. पण संकट अद्याप टळलेले नाही. पहिल्या व दुसºया टप्प्यातील लॉकडाऊनचा अनुभव गाठीशी घेवूनच आपण पुढचे धोरण ठरवू. मात्र केंद्राने व्यवहार सुरू करण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी राज्यांनी करावी. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवून जनजीवन पूर्ववत करण्याचे आव्हान आहे. कोरोनाचा मुकाबला व आर्थिक आव्हान दोन्हीचा सामना एकाच वेळी करावा लागेल. नव्या भागांमध्ये कोरोना पसरणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल.>‘रेड’ व ‘आॅरेंज’वर विशेष लक्ष द्यागेल्या २८ दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांत नवा रुग्ण आढळला नाही. पण ३ मे नंतरही सूट द्यावी अशी स्थिती नाही. राज्यात रेड, ग्रीन व आॅरेंज झोनवर विशेष लक्ष केंद्रीत करा. संसर्ग रोखणे व ग्रीन झोन सुरक्षित राखण्याचे मोठे आव्हान असेल. ग्रीन झोनमध्ये दैनंदिन व्यवहारांना सूट मिळू शकते पण फिजिकल डिस्टन्सिंगला पर्याय नसेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.>राज्यांनी धोरण ठरवावेरेड, आॅरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे. कोरोनामुळे इतर आजारांमुळे दूर्लक्ष नको.तंत्रज्ञान वापरून आपण जीवन सुरळीत व सोपे करू शकतो, असेही त्यांनी सांगितले. काही मुख्यमंत्र्यांनी आपले मत यावेळी नोंदवले.>पंजाब सरकारने नांदेडच्या गुरुद्वारा लंगर साहिब येथे अडकलेल्या जवळपास साडेतीन हजार भाविकांना स्वगृही आणण्यासाठी ८० बसेस पाठवल्या होत्या़ सोमवारी या गाड्यांमधून भाविक पंजाबला रवाना झाले़ गेल्या दीड महिन्यापासून हे भाविक नांदेडातच अडकले होते़

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस