शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

coronavirus: देशात पुन्हा लागणार लॉकडाऊन? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले सूचक संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 10:28 IST

coronavirus, Lockdown in India: देशभरात कोरोनाचे दीड लाखांहून अधिक रुग्ण सापडत असल्याने देशपातळीवर लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.

ठळक मुद्देआम्हाला अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प करायची नाही आहे देशात कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत असली तरी व्यापक पातळीवर लॉकडाऊन लावण्याची केंद्र सरकारची कुठलीही योजना नाही कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर नियंत्रणासाठी विशेष पावले उचलली जातील

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. (coronavirus in India) कोरोनामुळे महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा झाली आहे. तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर लॉकडाऊनसारखे निर्बंध लादण्यात आले आहेत. देशभरात कोरोनाचे दीड लाखांहून अधिक रुग्ण सापडत असल्याने देशपातळीवर लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी लॉकडाऊनबाबत सूचक संकेत दिले आहेत. (Lockdown in the India again? Indications given by Finance Minister Nirmala Sitharaman)

निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, देशात कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत असली तरी व्यापक पातळीवर लॉकडाऊन लावण्याची केंद्र सरकारची कुठलीही योजना नाही आहे. आम्हाला अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प करायची नाही आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे आता संपूर्ण देश लॉक होणार नाही. तर कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर नियंत्रणासाठी विशेष पावले उचलली जातील. कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांना वेगळे ठेवण्याबाबत उपाय केले जातील. स्थानिक पातळीवरील उपायांमधून संकटाचा सामना केला जाईल. मात्र लॉकडाऊन लावले जाणार नाही. 

अर्थ मंत्रालयाने याबाबत ट्विट करत कोरोना विषाणूच्या साथीला रोखण्यासाठी पाच सुत्री रणनीती तपासणी, माहिती घेणे, उपचार करणे, लसीकरण आणि कोविड-१९ पसरण्यापासून रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या माहितीचे विवरण प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री आठ वाजता जनतेला संबोधित करताना बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून १५ दिवसांच्या कठोर निर्बंधांची घोषणा केली होती.  देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढली आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान, अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. यामध्ये महाराष्ट्राबरोबरच छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत देशभरामध्ये कोरोनाचे १ लाख १४ हजार रुग्ण सापडले आहेत. तर मृतांची संख्याही एक हजाराच्या वर गेली आहे.  दरम्यान, जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांच्यासोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत सीतारामन यांनी भारताला विकासासाठी अधिक कर्ज घेण्याची मर्यादा वाढवण्यासाठी जागतिक बँकेने घेतलेल्या निर्णयाबाबत सीतारामन यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनEconomyअर्थव्यवस्थाHealthआरोग्य