शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

Covaxin घेतलेल्यांसाठी गुड न्यूज; लसीच्या आपात्कालिन वापरासाठी WHO ची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 17:48 IST

Approval For Covaxin WHO EUL : जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल अॅडव्हायझरी टीमनं कोव्हॅक्सिनच्या इमरजन्सी यूझ लिस्टिंगला दिली मंजुरी.

भारत बायोटेकची (Bharat Biotech) स्वदेशी कोरोना प्रतिबंधात्मक लस कोव्हॅक्सिन (Covaxin) घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार समूहानं भारताची कोरोना प्रतिबंधात्मक लस कोव्हॅक्सिनला इमरजन्सी यूझ लिस्टिंगसाठी (Emergency Use Listing, EUL) मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकनं इमरजन्सी यूझ लिस्टिंगसाठी १९ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य संघटनेकडे अर्ज केला होता. यापूर्वी कमिटीने दोनदा कोव्हॅक्सिन उत्पादित करणाऱ्या कंपनीकडून स्पष्टीकरण मागवलं होतं.

मागील आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार समितीने भारतातील स्वदेशी लस कोव्हॅक्सिन (Covaxin)ला आपत्कालीन वापरासाठी यादीत टाकण्यासाठी अतिरिक्त माहिती मागवली होती. या माहितीच्या आधारे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.आधीच्या बैठकीबाबत, WHO ने म्हटलं होतं की, लसीचा जागतिक वापर लक्षात घेता अंतिम लाभ-जोखीम मूल्यांकनासाठी निर्मात्याकडून अतिरिक्त स्पष्टीकरण मागवलं जाणं आवश्यक आहं असं 'तांत्रिक सल्लागार गटाने बैठकीत निर्णय घेतला. ग्लोबल हेल्थ एजन्सीनं आधीच स्पष्ट केलं आहे की ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे याची खात्री करण्यासाठी तिचे पूर्ण मूल्यांकन करणे आवश्यक आहे.वापराचा कालावधी वाढवलासीडीएससीओनं उत्पादनाच्या तारखेपासून १२ महिन्यांपर्यंत कोव्हॅक्सिनचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती भारत बायोटेकनं यापूर्वी ट्विटरद्वारे दिली होती. वापरासाठी मिळालेली ही मंजुरी स्थायी आकड्यांच्या उपलब्धतेवर आधारित आहे, जो सीडीएससीओकडे सादर करण्यात आला होता असंही भारत बायोटेककडून सांगण्यात आलं.

भारत बायोटेकच्या लसीला अनेक देशांची मान्यताWHO ने आतापर्यंत ६ लसींना मान्यता दिली आहे. यामध्ये फायझर, बायोएनटेक (Pfizer/BioNtech) कोमिरनेटी, एस्ट्राजेनेका कोविशील्ड (AstraZeneca's Covishield) जॉन्सन अँन्ड जॉन्सन (Johnson & Johnson's Vaccine), मॉडर्ना (Moderna) सिनोफार्म( Sinopharm)या लसींचा समावेश आहे.  तथापि, असे अनेक देश आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ करण्यासाठी आणि प्रवाशांना त्यांच्या देशात प्रवेश करण्यासाठी कोव्हॅक्सिनला मान्यता दिली आहे. या देशांमध्ये गयाना, इराण, मॉरिशस, मेक्सिको, नेपाळ, पॅराग्वे, फिलीपिन्स, झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया, ओमान, श्रीलंका, एस्टोनिया आणि ग्रीस यांचा समावेश आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची कोविशील्ड या भारतात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या दोन लसी आहेत. ऑस्ट्रेलियाने आधीच कोविशील्डला मान्यता दिली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या