शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धसका! रुग्णसंख्येत वाढ होताच 'या' ठिकाणी झाली महिन्याभरात तब्बल 5 कोटी पॅरासिटामॉलची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 17:08 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या एजिथ्रोमायसिन आणि डॉक्सीसायक्लिन या गोळ्यांची विक्री दोन कोटींहून अधिक झाली आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आणि औषधांची विक्रीही वाढली.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2,60,31,991 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,59,591 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,209 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,91,331 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याबरोबरच औषधांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. याच दरम्यान एका ठिकाणी महिन्याभरात तब्बल 5 कोटी पॅरासिटामॉल विकल्या गेल्याची घटना समोर आली आहे. 

उत्तराखंडमधील कुमाऊमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. एका महिन्यात पाच कोटी पॅरासिटामॉल गोळ्यांची विक्री झाल्याची माहिती समोर येत आहे. तर कोरोनावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या एजिथ्रोमायसिन आणि डॉक्सीसायक्लिन या गोळ्यांची विक्री दोन कोटींहून अधिक झाली आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आणि औषधांची विक्रीही वाढली. अनेक ठिकाणी लोकांनी आधीच औषधं घेऊन ठेवल्याचंही दिसून आलं. येथील ऊधमसिंह नगर आणि हल्द्वानी येथून डोंगळार भागांमध्ये औषधांचा पुरवठा केला जातो. अनेक डॉक्टर कोरोना रुग्णांसाठी एजिथ्रोमायसिन आणि डॉक्सीसायक्लिन औषधच लिहून देत आहेत. 

काही ठिकाणी साडेसहाशे एमजी पॅरासिटामॉल गोळी घेण्याचाही सल्ला डॉक्टर देत आहेत. तसेच बी कॉम्पलेक्स, झिंकबरोबरच, क जीवनसत्व आणि आयवरमेक्टिनच्या गोळ्याही लिहून दिल्या जात आहेत. बी कॉम्पलेक्स झिंकबरोबरच क जीवनसत्वाच्या दोन दोन कोटी गोळ्यांची विक्री झाली आहे. त्याबरोबरच आयवरमेक्टिनच्या 50 लाख किंमतीच्या गोळ्या विकल्या गेल्यात. कुमाऊंमध्ये ड जीवनसत्वाची पाकिटं आणि गोळ्यांची पाच लाखांच्या आसपास विक्री झाली आहे. श्वसनासंदर्भातील त्रासांसाठी इन्हेलरचा वापर करण्याचा सल्लाही डॉक्टर देत असल्याने त्याचीही विक्री वाढली आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारादम्यान रक्त पातळ करणारं इंजेक्शन दिलं जातं. मात्र या इंजेक्शनची आता कमतरता उत्तराखंडमधील कुमाऊंमध्ये जाणवू लागली आहे. 

एजिथ्रोमायसिन आणि डॉक्सीसायक्लिन या गोळ्यांचीही कमतरता जाणवू लागली आहे. कोरोनावरील उपाय म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वापरण्यात येणारी आयुर्वेदिक औषध आयुष 64 आणि पतंजलीच्या कोरोनील गोळ्याही बाजारात उपलब्ध नाहीत. केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशनचे अध्यक्ष उमेश जोशी यांनी "पॅरासिटामॉल आणि अँटीबायोटिक गोळ्यांची मागणी वाढली आहे. पॅरासिटामॉलचे जवळजवळ चार ते पाट कोटी आणि दोन कोटी अँटीबायोटिक गोळ्यांची विक्री झाली आहे. त्याबरोबरच जीवनसत्व क, जीवनसत्व ड आणि बी कॉम्पलेक्सबरोबरच झिंकच्या गोळ्यांचीही मागणी वाढली आहे" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याuttara-kannada-pcउत्तरा कन्नडIndiaभारतmedicinesऔषधं