शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Video - ना कोरोनाची चिंता...ना नियमांची भीती! निर्बंधांची एैशीतैशी, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; पर्यटकांची तुफान गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 11:16 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : लोकांना कोरोनाची चिंताच नसून नियमांचीही अजिबात भीती नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. धबधब्यात भिजण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली आहे.

नवी दिल्ली -  देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 3,07,09,557 वर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 45,892 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 817 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,05,028 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तराखंडमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. कोरोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे. 

लोकांना कोरोनाची चिंताच नसून नियमांचीही अजिबात भीती नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. धबधब्यात भिजण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं असताना लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा पाहायला मिळत आहे. मास्क न लावता लोकांनी शेकडोच्या संख्येने गर्दी केली आहे. उत्तराखंडच्या मसूरीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये केम्पटी फॉल्सवर मोठ्या संख्येने पर्यटक आले असून मजा करत आहेत. मास्क आणि सोशल डिस्टंसिंगशिवाय लोक असलेले पाहायला मिळत आहे. 

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे लोकांचा अशा प्रकारे हलगर्जीपणा वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी कोरोना नियमावलीचे तीन-तेरा वाजलेले पाहायला मिळाले. मसूरीमध्ये फक्त धबधब्याजवळच नाही तर कुल्डी बाजार, मॉल रोडवरही हजारो पर्यटकांची गर्दी होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतात कोरोनाचा वेग मंदावत असला तरी डेल्टा प्लसचा कहर पाहायला मिळत आहे. मात्र अनेक ठिकाणी लोकांचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. काही जण मास्क न लावता फिरत आहेत. कोरोनाच्या संकटात मास्क अत्यंत महत्त्वाचा आहे. डेल्टा व्हॅरिएंट (Delta Variant) अधिक घातक असल्यानं आपल्याला कोरोनाच्या नियमांचं पालन अधिक काटेकोरपणे करावं लागणार आहे. त्यात मास्क हे सर्वांत मोठं शस्त्र आहे. कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटनुसार मास्क घालणं किती गरजेचं आहे. 

धोका वाढला! देशात Delta Plus चा हाहाकार, नेमका कसा मास्क वापरावा?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

नवी दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलचे डॉक्टर (लेफ्टनंट जनरल) वेद चतुर्वेदी यांनी मास्क घालण्याबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे. मास्कबाबत केवळ एकाच देशात नाही, तर जगभर संशोधन करण्यात आलं. तीन प्रकारचे मास्क आहेत. एक कॉटन म्हणजे साधा कापडी मास्क, दुसरा सर्जिकल आणि तिसरा एन95. यापैकी एन95 हा मास्क सर्वांत जास्त सुरक्षित असून, याचा सर्वाधिक वापर डॉक्टर करतात. तुम्हाला जवळच कुठे तरी जायचं असेल तर कॉटन मास्कसह सर्जिकल मास्कदेखील वापरा, असा सल्ला चतुर्वेदी देतात. ज्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झालेला असण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तीला भेटण्याची वेळ आल्यास डबल मास्क लावा किंवा एन95 मास्कदेखील (N 95 Mask) वापरू शकता. मास्कशिवाय घराबाहेर पडू नका, असंही डॉ. चतुर्वेदी सांगतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत