शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
5
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
6
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
7
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
8
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
9
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
10
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
11
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
12
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
13
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
14
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
15
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
16
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
18
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
19
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
20
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

CoronaVirus Live Updates : कोरोनाची धास्ती! कर्नाटक सरकारने 7 जूनपर्यंत वाढवला लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 20:02 IST

Karnataka Covid lockdown State extends lockdown till June 7 : कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकमधील लॉकडाऊन हा 7 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. 

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,60,31,991 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,59,591 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,209 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,91,331 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकमधील लॉकडाऊन (Karnataka Covid lockdown) हा 7 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनासंदर्भात वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांसोबत बैठक घेण्यात आली. त्यानंतर लॉकडाऊनबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 24 मे पर्यंत राज्यात क़डक निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र आता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हे 7 जून पर्यंत वाढवण्यात आलं आहे. कोरोना संकटात कर्नाटक सरकारने (Karnataka Government-) गरजूंसाठी आपली तिजोरी उघडली आहे. तब्बल 1250 कोटींच्या कोविड रिलीफ पॅकेजची (Relief Package) मोठी घोषणा केली आहे. कर्नाटक सरकारने आता 1250 कोटी रुपयांचं कोविड रिलीफ पॅकेज जाहीर केलं आहे. 

कोरोना संकटात "या" सरकारने गरजूंसाठी उघडली तिजोरी; 1250 कोटींच्या Relief Package ची मोठी घोषणा

रिलीफ पॅकेजच्या माध्यमातून बांधकामाशी संबंधित कामगार, रिक्षा-टॅक्सी ड्रायव्हर, फिल्मलाईनमधले वर्कर्स, फुटपाथवर भाज्या-फळे विकणारे लोक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील गरजू लोकांना आर्थिक मदत मिळणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी या रिलीफ पॅकेजची घोषणा केली आहे. वरिष्ठ अधिकाऱी आणि कॅबिनेट मंत्र्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीदरम्यान हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आमच्या सरकारने गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळातही असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत दिली होती. आता पुन्हा एकदा ती देणार असल्याची घोषणा करत असल्याचं म्हटलं आहे. 

शेतकऱ्यांसह असंघटित क्षेत्रांमधील कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहत आहे. त्यामुळे आम्ही 1250 कोटींहून अधिकचं पॅकेज जाहीर करत आहोत, असं मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सांगितलं. तसेच आम्ही जे काही करु शकत होतो ते आम्ही केलं आहे आणि यापुढेही गरज लागल्यास आम्ही करायला तयार आहोत असंही म्हटलं आहे. नोंदणीकृत बांधकाम कर्मचारी आणि मजुरांना प्रत्येकी 3000 रुपयांचं अर्थसाहाय्य दिलं जाणार आहे. हे एकूण पॅकेज 494 कोटी रुपयांचं आहे. तर सलून चालक, टेलर, घरकाम करणारे, मॅकेनिक अशा असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना प्रत्येकी 2000 रुपये देण्यात येणार आहेत. तर फिल्मलाईन वर्कर्सला 3 हजार देण्यात येणार आहेत. गरीब कल्याण योजने अंतर्गत गरजूंना 5 किलो तांदूळ देण्यात येणार आहेत. कर्नाटकमध्ये देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकIndiaभारतYeddyurappaयेडियुरप्पा