शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
3
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
4
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
5
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
6
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
7
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
8
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
9
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
10
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
11
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
12
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
13
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
14
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
15
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
16
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
17
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
18
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
19
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! आता कोरोनाग्रस्तांसाठी मोबाईलवर बुक होणार बेड; फोनवरच डॉक्टर देणार सल्ला; 'या' राज्यात सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 17:37 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : राज्यातील कोरोना रुग्णांना बेडची सुविधा आता मोबाईलवर उपलब्ध होऊ शकणार आहे. यासोबतच डॉक्टरांचा सल्ला हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरही मिळू शकेल.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या दोन कोटींवर पोहोचली आहे. देशभरातील अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णांची वाढती संख्या, बेड्सची आणि ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत. ऑक्सिजनची कमतरता असल्याने आपल्या रुग्णाला इतर ठिकाणी हलवा असं रुग्णालयाच्या वतीने देखील सांगण्यात आलं आहे. डॉक्टर्सही या गंभीर परिस्थिती पुढे हतबल झाले आहेत. याच दरम्यान झारखंडमधील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

राज्यातील कोरोना रुग्णांना बेडची सुविधा आता मोबाईलवर उपलब्ध होऊ शकणार आहे. यासोबतच डॉक्टरांचा सल्ला हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरही मिळू शकेल. मुख्यमंत्री हेमंन सोरेन यांनी राज्यात वाढणाऱ्या संसर्गादरम्यान नागरिकांना तातडीने सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अमृतवाहिनी वेबसाईट, मोबाईल अ‍ॅप आणि चॅटबोटचं उद्धाटन केलं आहे. याच्या माध्यमातून रुग्ण आता रुग्णालयात ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर आयसीयू बेड ऑनलाईन बुक करू शकतात. सोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅटबोटच्या माध्यमातून डॉक्टरांशी चर्चा करीत कोरोनाशी संबंधित माहिती घेऊ शकतात. 

मुख्यमंत्र्यांनी लोकांना आग्रह केला आहे की, त्यांनी सर्दी, ताप याकडे दुर्लक्ष करू नये. ही कोरोनाची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. जर कोणामध्ये ही लक्षणं दिसत असतील तर त्यांनी आयसोलेट व्हावं आणि लवकरात लवकर टेस्ट करून घ्यावी. यातून तुम्ही स्वत:चा जीव तर वाचवू शकालच शिवाय कुटुंबालाही सुरक्षित ठेवू शकाल.नागरिकांनी अमृतवाहिनी वेबसाईट आणि अ‍ॅपवर राज्यातील सर्व सरकार आणि खासगी रुग्णालयात कोविड बेड, ऑक्सिजन बेड, आयसीटू बेड आणि व्हेंटिलेटर बेड्सच्या उपलब्धतेची रिअल टाईम माहिती द्यावी. या माध्यमातून ऑनलाईन बुकिंगची सुविधाही मिळेल.

जे कोरोना रुग्ण आयसोलेशनमध्ये आहेत, ते या माध्यमातून कोरोना मेडिकल किट घेऊ शकतात. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबोड नंबर 8595524447 वर डॉक्टरांच्या सल्लाने करता येऊ शकते. यासोबत औषधं, डाएट चार्ट, जिल्हा कंट्रोल रुममध्ये संपर्क, प्लाझ्मा डोनेट, होम आयसोलेशन किट संबंधित माहितीही घेऊ शकता. रुग्णालय रेमेडेसिवीर आणि अन्य औषधांची मागणी अ‍ॅपच्या माध्यमातूनही करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,18,92,676 वर पोहोचला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसJharkhandझारखंडIndiaभारतdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल