शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

CoronaVirus Live Updates : तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात? नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट; मृतांचा आकडाही झाला कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 10:10 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली - जगात कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 44,877 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (13 फेब्रुवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 44 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 684 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशभरात 5,08,665 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 5,37,045 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

कोरोना लसीचे 2 डोस घेतल्यावर साईड इफेक्टने किती जणांचा मृत्यू झाला?; सरकारनं सांगितला आकडा

देश कोरोना संकटाचा सामना करत असून कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान लसीच्या साईड इफेक्टची देखील चर्चा रंगली होती. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर साईड इफेक्ट्समुळे झालेल्या मृतांचा आकडा आता समोर आला आहे. अँटी-कोविड-19 लसीचा (corona vaccines) दुसरा डोस घेतल्यानंतर विपरित परिणामांच्या घटनांमध्ये 167 लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी शुक्रवारी लोकसभेत ही माहिती दिली. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली आहे. अशी सर्वाधिक 43 प्रकरणे केरळमध्ये झाल्याची माहिती भारती पवार यांनी सभागृहात दिली. 

देशाचा रिकव्हरी रेट हा 97.37 टक्क्यांवर

महाराष्ट्रात 15, पश्चिम बंगालमध्ये 14 आणि मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये प्रत्येकी 12 मृत्यू झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. देशाचा रिकव्हरी रेट हा 97.37 टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसर्‍या प्रश्नाच्या लेखी उत्तरात आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, गेल्या 3 फेब्रुवारीपर्यंत स्तनपान देणाऱ्या महिलांमध्ये लसीकरणानंतरच्या प्रतिकूल परिणामांची 13 प्रकरणे नोंदवली गेली आणि ती सौम्य लक्षणे होती. कोरोनाच्या संकटात पाच राज्यांनी चिंता वाढवली असून तेथील परिस्थिती ही गंभीर आहे. यामध्ये केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि राजस्थानचा समावेश आहे. नव्या रुग्णांपैकी 60 टक्क्यांहून अधिक रुग्ण याच पाच राज्यांतील आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत