शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,270 नवे रुग्ण, 15 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 10:19 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत.

नवी दिल्ली - कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जगभरातील रुग्णसंख्येने तब्बल 53 कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतातही कोरोनाचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. 

कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (5 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,270 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 5,24,692 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेकांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशातील कोट्यवधी लोकांनी कोरोनावर मात केली असून अनेकांनी लस देखील घेतली आहे. मात्र आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मास्क लावण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ दिसत आहे. कोरोनाचा स्फोट पुन्हा होऊ नये म्हणून खबरदारी ही बाळगायलाच हवी. त्यासाठी मास्कचा वापर करायला हवा असे मत टास्क फोर्स तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

आरोग्य विभागाने वेळीच खबरदारी घेत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. मास्क घालणे ऐच्छिक असले, तरी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी सिनेमागृहे, सभागृहे, कार्यालयांमधील बंदिस्त ठिकाणी, तसेच सार्वजनिक ठिकाणांवर मास्क घालणे आवश्यक आहे. त्याच वेळी, कोरोना चाचण्यांची संख्या कमी झाल्याने ती वाढवावी. हे प्रमाण सध्या असलेल्या चाचण्यांपेक्षा दुप्पट करावे, अशा सूचनाही आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

राज्य कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले, वाढत्या कोरोना संसर्गावर तज्ज्ञांचे बारकाईने लक्ष आहे. वाढता संसर्ग आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींनी अधिक काळजी घेतली पाहिजे. त्यात गर्भवती, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. याखेरीज, कोरोना गेला ही मानसिकता बदलून मास्कचा वापर, गर्दीत वावर कमी, स्वच्छतेचे निकष आणि शारीरिक अंतर हे नियम पाळले पाहिजेत. शिवाय, लसीकरणाकडे दुर्लक्ष न करता वर्धक मात्रासुद्धा घेतली पाहिजे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत