शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार ! गेल्या २४ तासांत ३,५२,९९१ नवे रुग्ण, २८१२ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 10:33 IST

CoronaVirus Live Updates : देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ झाली असून, त्यातील १ कोटी ४३ लाख जण बरे झाले.

ठळक मुद्देदेशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २८ लाख १३ हजार ६५८ इतकी आहे. 

नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांत ३ लाख ५२ हजार ९९१ नवे रुग्ण आढळले. तर दिसभरात कोरोनामुळे २८१२ जणांचा मृत्यू झाला. तसेच २ लाख १९ हजार २७२ रुग्ण बरे झाले आहेत. जगातील इतर देशांपेक्षा भारतात दिवसेंदिवस सर्वाधिक नवे रुग्णांची नोंद होत आहे. (India reports 3,52,991 new COVID19 cases, 2812 deaths and 2,19,272 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ झाली असून, त्यातील १ कोटी ४३ लाख जण बरे झाले. या कोरोना संसर्गाने आतापर्यंत १ लाख ९५ लाख १२३ जणांचा बळी घेतला आहे. देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २८ लाख १३ हजार ६५८ इतकी आहे. 

दरम्यान, जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल १४ कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे. तर आता कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. याशिवाय, देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवर वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

अमेरिकेमध्ये ३ कोटी २७ लाख कोरोना रुग्ण जगभरात कोरोना रुग्णांची संख्या १४ कोटी ७१ लाख असून त्यातील १२ कोटी ४७ लाख लोक बरे झाले आहेत. तसेच ३१ लाख लोकांचा बळी गेला आहे. जगामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या अमेरिकेमध्ये ३ कोटी २७ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील २ कोटी ५३ लाख जण बरे झाले तर ५ लाख ८५ हजार जणांचा बळी गेला. या देशात ६८ लाख उपचाराधीन रुग्ण आहेत. ब्राझिलमध्ये कोरोना बळींची संख्या ३ लाख ८९ हजार असून ती भारतापेक्षा जास्त आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत