शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

CoronaVirus Live Updates : वाढता वाढता वाढे! देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,927 नवे रुग्ण, 32 जणांचा मृत्यू     

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 10:49 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. 

नवी दिल्ली - कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जगभरातील रुग्णसंख्येने तब्बल 51 कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतातही कोरोनाचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. 

कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (27 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,927 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 5,23,654 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेकांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लाखो रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. काही राज्यांनी कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. याच दरम्यान रिसर्चमधून कोरोनाच्या भयानक परिणामाबाबत माहिती समोर आली आहे. चेन्नईतील सरासरी आयुर्मान सुमारे 4 वर्षांनी कमी झाल्याचे एका रिसर्चमध्ये समोर आले आहे. ते 70.7 वर्षांवरून 66.4 वर्षांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे  आरोग्याबाबत पूर्वीपेक्षा अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे.

कोरोनाचा भयानक परिणाम! लोकांचे सरासरी वय 4 वर्षांनी झाले कमी; रिसर्चमधून खुलासा

लान्सेट इन्फेक्शन डिसीज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या रिपोर्टनुसार, जून 2021 पर्यंत चेन्नईमध्ये कोरोनामुळे सुमारे 8000 लोकांचा मृत्यू झाला. याशिवाय लॉकडाऊन, वेळेवर उपचार न मिळणे आणि वैद्यकीय सेवेचा अभाव यामुळेही लोकांना जीव गमवावा लागला आहे. TOI नुसार, सार्वजनिक आरोग्य संचालक डॉ. टीएस सेल्वा विनयगम, जे या रिसर्चचा भाग होते, म्हणाले की अमेरिका, ब्रिटन, इटली, स्पेन सारख्या देशांमध्ये भारतापेक्षा जास्त वृद्ध लोक आहेत. तरीही, एक हजार लोकांमध्ये सरासरी 1.6 ते 2.1 अधिक मृत्यू नोंदवले गेले, तर चेन्नईमध्ये ते एक हजारामध्ये 5.2 होते. हा मृत्यू दर सामान्यपेक्षा जास्त आहे. या उच्च मृत्युदरामुळे, चेन्नईतील आयुर्मान कमी झाले. 2020 मध्ये ते 69.5 वर्षे कमी झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ते आणखी कमी केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लस